Tue, Nov 13, 2018 08:58होमपेज › Jalna › रानडुकरांनी दोन एकरांतील मका केली फस्त

रानडुकरांनी दोन एकरांतील मका केली फस्त

Published On: Jul 17 2018 1:34AM | Last Updated: Jul 17 2018 12:34AMजालना : प्रतिनिधी

तालुक्यातील माळशेंद्रा शिवारात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे़  शनिवारी रात्री विश्वनाथ आसाराम जाधव  यांच्या दोन एकर शेतातील कोवळी मका रानडुकरांनी फस्त केली़ त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे़विश्वनाथ जाधव यांनी दोन एकरांत तीन बॅग मका लागवड केली होती़  मका पिकाची चांगली उगवण झाल्यानंतर जाधव यांनी खत व तणनाशकावर सुमारे दहा हजारांचा खर्च केला़,  मात्र रात्रीतूनच सर्व पीक रानडुकरांनी उद्ध्वस्त केले़ यामुळे शेतकर्‍यांवर संकट कोसळले. महसूल विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विश्वनाथ जाधव यांनी केली आहे़