Sun, Apr 21, 2019 05:48होमपेज › Jalna › चित्राल यांनी अठराव्या दिवशी सोडले उपोषण

चित्राल यांनी अठराव्या दिवशी सोडले उपोषण

Published On: May 18 2018 1:16AM | Last Updated: May 17 2018 11:55PMअंबड :  प्रतिनिधी

पोलिस ठाण्यातील चोरीचा वाळूचा पकडलेल्या हायवा ट्रक सोडून देण्यासाठी दबाव आणणारे पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी देवानंद चित्राल उपोषणास बसले होते. सतराव्या दिवशी म्हणजे गुरुवार, 17 रोजी तहसीलदार दत्तात्रय भारस्कर यांनी दिलेल्या लेखीपत्रानंतर उपोषण मागे घेतले.

5 मार्च रोजी वाळूमाफियांना संरक्षण देणार्‍या आणि त्यासाठी सहकारी फौजदार माने यांना फोन करून दबाव आणणारे पोलिस निरीक्षक देविदास शेळके  यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. याप्रकरणी पो.नि.शेळके यांच्यावर गुन्हा नोंद करावा नसता आंदोलनाचा इशारा जनआंदोलन समितीचे देवानंद चित्राल यांनी दिला होता. कार्यवाही न झाल्याने 15 मार्च रोजी चित्राल यांनी अंबड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली. 19 मार्च रोजी उपविभागीय पोलिस अधीक्षक यांच्या दोन दिवसांत कार्यवाहीच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले, परंतु आठ दिवसानंतरही कार्यवाही झाली नाही.  त्यामुळे पुन्हा 30 एप्रिल रोजी पुन्हा तहसील कार्यालय समोर उपोषणाला बसले. शेळकेंसोबतच आमदार नारायण कुचे यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी केली. सहा दिवसांनंतर वैद्यकीय तपासणी करून प्रथम जालना व नंतर औरंगाबाद येथील घाटी रुग्णलयात दाखल केले होते. तेथेही पाच दिवस उपोषण केले. त्या नंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यावर औरंगाबाद येथील पोलिस महानिरीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याची तयारी चित्राल यांनी केली होती. तेथील संवेदनशील वातावरणामुळे परवानगी मिळाली नाही. त्यामुळे अंबडला उपोषण केले.