Sun, Jul 21, 2019 11:59होमपेज › Jalna › आरती गायकवाड ठरली ‘मिस जालना’ 

आरती गायकवाड ठरली ‘मिस जालना’ 

Published On: May 21 2018 1:17AM | Last Updated: May 21 2018 1:17AMजालना  : प्रतिनिधी

‘जालना महोत्सवा’त शनिवारी मिस जालना व मिस्टर जालना ही स्पर्धा घेण्यात आली़ त्यात आरती गायकवाड ही ‘मिस जालना’ ठरली  तर शुभम मुंदडा हा ‘मिस्टर जालना’ ठरला़ ‘मिस्टर जालना’ स्पर्धेसाठी 54 प्रवेशिका आल्या होत्या़  त्यापैकी 16 स्पर्धकांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली़   या स्पर्धेत हरिओम कुलकर्णी याने द्वितीय  क्रमांक पटकाविला़  ‘मिस जालना’ स्पर्धेसाठी 42 प्रवेशिका आल्या होत्या़  त्यापैकी 8 स्पर्धकांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली़  आरती गायकवाड ही या स्पर्धेत विजेती ठरली़  प्रतीक्षा नवगिरे हिने द्वितीय  क्रमांक पटकाविला़   तसेच मोनिका राठोड हिने तृतीय क्रमांक पटकाविला़ भक्ती पौनगट्टी हिला बेस्ट फोटोजेनिकचा पुरस्कार मिळाला़  मयूरी जैन हिला ‘बेस्ट स्माईल’चा पुरस्कार मिळाला़  स्पर्धेचे

परीक्षक म्हणून मयुरेश अभ्यंकर, स्मिता आष्टीकर व प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिले़ ‘मिस्टर जालना’ व ‘मिस जालना’ स्पर्धेतील विजेत्यांना जालना महोत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री बबन लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर तसेच विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली़  यावेळी जालना महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष घनश्याम गोयल, स्वागत उपमंत्री विरेंद्रप्रकाश धोका, कार्याध्यक्ष भावेश पटेल, बंडुभाऊ मिश्रीकोटकर, सुभाषचंद्र देविदान, मनीष तवरावाला, डॉ़  नीता जैन, सुदेश करवा आदींची उपस्थिती होती़.