Sat, Jul 04, 2020 07:29होमपेज › Jalna › जालना : मोबाईलसाठी तगादा; लग्नाआधीच तरुणाची आत्महत्या

जालना : मोबाईलसाठी तगादा; लग्नाआधीच तरुणाची आत्महत्या

Last Updated: May 20 2020 7:11PM

संग्रहित छायाचित्रआष्टी (जालना) : पुढारी वृत्तसेवा 

परतूर तालुक्यातील येनोरा येथे एका युवकाने विषारी औषध सेवन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी जालना येथे सरकारी रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान आज त्याचा मृत्यू झाला. रामभाऊ पाजगे (वय २७ वर्षे रा. कावजवळा ता. परतूर) असे मयताचे नाव असून याप्रकरणी पोलिसांत मृत्यूचे कारण अत्महत्या अशी नोंद करण्यात आली आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती आशी की, मयत रामभाऊ पाजगे (वय २७ वर्षे रा. कावजवळा ता. परतूर) यास गावातील मीना आसाराम घोडे, आसाराम दशरथ घोडे, लक्ष्मीबाई आसाराम घोडे, नामदेव आसाराम घोडे (सर्व रा. काव जवळा ता. परतूर) यांनी होणाऱ्या बायकोस २० हजारांचा मोबाईल घेऊन दे असा वारंवार तगादा लावला होता. त्यांच्या या जाचास व मानहानीस कंटाळून अरुण पाजगे याने येनोरा येथील आसाराम दसरथ घोडे यांच्या घरासमोर (दि १८ मे रोजी) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विषारी औषध सेवन केले. त्यास उपचारासाठी जालना येथे सरकारी रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान आज त्याचा मृत्यू झाला. मयताचे वडील रामभाऊ नानाभाऊ पाजगे (वय ५८ वर्षे) यांच्या फिर्यादीवरून वरील चार जणांविरुद्ध मृत्यूस प्रवृत्त करणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपपोलिस निरीक्षक राजधर पठाडे हे करीत आहेत