Wed, Jan 23, 2019 01:09होमपेज › Jalna › ‘समृद्धी’साठी 81 टक्के भूसंपादन

‘समृद्धी’साठी 81 टक्के भूसंपादन

Published On: Jul 09 2018 1:02AM | Last Updated: Jul 09 2018 1:02AMजालना : प्रतिनिधी

शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-नागपूर या 710 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यांत सरळ खरेदीने वेग घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात 81.41 टक्के भूसंपादन झाले आहे. या महिन्यात कधीही भूसंपादन कायदा अधिसूचना प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. अधिसूचना प्रसिध्द झाल्यास सरळ खरेदीचे व्यवहार बंद होईल.

समृद्धी महामार्गाच्या जमीन खरेदीसाठी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याने 81 टक्के भूसंपादन झाले आहे. नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग हा जिल्ह्यातील 25 गावांमधून जात आहे. यात जालना तालुक्यातील 15 व बदनापूर तालुक्यातील 10 गावांचा समावेश असून 1 हजार 154 शेतकर्‍यांकडून 440 हेक्टर जमीन संपादिक केली जाणार आहे. यात जालना तालुक्यातील 711 शेतकर्‍यांकडून  274 हेक्टर 71 आर तर बदनापूर तालुक्यातील 443 शेतकर्‍यांकडून 165 हेक्टर 49 आर संपादित केली जाणार आहे. 5 जुलैपयर्र्ंत जिल्ह्यात 81.41 टक्के भूसंपादन करण्यात आले आहे. यात खासगी जमीन 339 हेक्टर 97 आर तर शासकीय जमीन 76 हेक्टर 1 आर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. यात जालना तालुक्यातील 396 शेतकर्‍यांकडून 191 हेक्टर 45 आर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे.  तर  बदनापूर तालुक्यातील  334 शेतकर्‍यांकडून 148 हेक्टर 52 आर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले. आतापयर्र्ंत खासगी जमिनीचे एकूण 78.21 टक्के भूसंपादन झाले आहे. उर्वऱित 424 शेतकर्‍यांकडून भूसंपादन करणे बाकी आहे. फेबुवारी महिन्यात भूसंपादन कायदा अधिसूचना जाहीर झाल्यामुळे भूसंपादन प्रक्रियेस वेग आला आहे. आतापयर्र्ंत धावेडी, कडवंची आणि दूधनवाडी या गावातील शंभर टक्के भूसंपादन झाले असून आंबेडकरवाडी येथील एकही खरेदी झालेली नाही. याशिवाय अकरा गावांमध्ये एक ते चार हेक्टरपर्यत भूसंपादन बाकी आहे.