Thu, Jul 18, 2019 06:04होमपेज › Jalna › पावसामुळे 75 टक्के पेरण्या खोळंबल्या

पावसामुळे 75 टक्के पेरण्या खोळंबल्या

Published On: Jul 02 2018 1:43AM | Last Updated: Jul 01 2018 10:26PMपरतूर : केदार शर्मा

तालुक्यात मृग नक्षत्रात दोन ते तीन पाऊस वगळता इतर दिवस कोरडे गेल्याने तालुक्यातील खरिपाच्या 75 टक्के पेरण्या खोळंबल्या आहेत. अल्प पावसावर झालेली 25 टक्के पेरणी धोक्यात आली आहे. शेतकर्‍यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत.

तालुक्यात सुमारे 32 हजार हेक्टरवर कापूस लागवडीची शक्यता असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. त्या पाठोपाठ सोयाबीन लागवडीचे प्रमाण असण्याची शक्यता वर्तविली. कृषी अधिकारी कांबळे यांनी यंदा उन्नत शेती समृद्ध शेती अभियानांतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेंतर्गत 22 ठिकाणी डेमो लागवड करण्यात आल्याचे सांगितले. यात तूर व सोयाबीनचे 9, कापूस व मूग 5, उडीद व कापूस 2 व उर्वरित सोयाबीनची डेमो लागवड निवडक शेतकर्‍यांच्या शेतात प्रात्यक्षिक लागवड केल्याचे सांगितले. बोंडअळीबाबत शेतकर्‍यांत भीती आहे, मात्र कापसाच्या वाढीनंतरच काय ती परिस्थती समजेल असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले. बोंडअळी प्रादुर्भावाबाबत आताच सांगता येणार नसल्याचे सांगितले. 

तालुक्यात पेरणीयोग्य 65 ते 70 हजार हेक्टर एवढे क्षेत्र आहे. गतवर्षी 28 जूनपर्यंत पेरा अहवालानुसार तालुक्यात 49 हजार हेक्टर पेरा झालेला होता. तालुक्यात 80 टक्के पेरणी झाली होती.