होमपेज › Jalna › आरक्षणापासून ५९ जाती वंचित : प्रा. ढोबळे 

आरक्षणापासून ५९ जाती वंचित : प्रा. ढोबळे 

Published On: Jul 29 2018 1:37AM | Last Updated: Jul 29 2018 1:34AMजालना : प्रतिनिधी

बाप मेल्यानंतर सवलतीच्या संपत्तीची वाटणी झालीच नाही. संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिवलेला सवलतीचा शर्ट थोरल्याने आणूनच दिला नाही. म्हणून अनुसूचित जातीतील 59 जाती सवलतींपासून वंचित राहिल्या. याची जाणीव झाल्याने आरक्षणाच्या वर्गवारीसाठी तरुण पुढे येत आहेत. न्यायालयीन लढाईत प्रत्येकाने वाटा उचलावा तर थोरल्या भावानेही मदत करावी, असे आवाहन प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केले. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सामाजिक व्याख्यानमाला  उद्घाटन शुक्रवारी (दि. 27) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आली. यावेळी प्रा. ढोबळे बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेंद्र जैस्वाल हे होते. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, संजय इंचे, व्याख्यानमालेचे अध्यक्ष डी.ई. नागवाड, सचिव लालुप्रसाद भिसे, कार्याध्यक्ष शेख महेमुद, सी. के.डोईफोेेडे, शिवराज जाधव, संतोष तुपसौंदर, गणेश भालेराव, अविनाश साळवे, शांतीलाल लोंढे, रवींद्र म्हस्के यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

मातंग समाज चळवळ व आरक्षण सद्यःस्थिती या विषयावर पहिले पुष्प गुंफतांना प्रा. ढोबळे यांनी मंदाकृष्ण यांच्या लढाईचा संदर्भ देत बारा राज्यांनी स्वतंत्र आरक्षणाचा ठराव केंद्राकडे पाठविला आहे, तर आठ राज्ये तयार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.