Sun, May 31, 2020 00:57होमपेज › Jalna › जालन्यात सात जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; जिल्ह्याची रुग्ण संख्या ५१ वर

जालन्यात सात जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; जिल्ह्याची रुग्ण संख्या ५१ वर

Last Updated: May 22 2020 11:42AM

संग्रहीक छायाचित्रजालना : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात पुन्हा नवीन सात रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ५१ वर पोहचला आहे.

वाचा :जालना : मोबाईलसाठी तगादा; लग्नाआधीच तरुणाची आत्महत्या

जिल्हा रुग्णालयाने बुधवारी एकूण १३७ संशयित रुग्णांचे स्वॅब औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. याबाबतचा अहवाल गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त झाला आहे. यामध्ये भोकरदन येथे ठेवण्यात आलेल्या राज्य राखीव दलातील ६२ जवान, नवीन जालना भागातील खासगी रुग्णालयाशी संबधित २४ ते २५, जिल्हा रुग्णालयातील ३२, मंठा तालुक्यातील पेवा येथील १५ आणि परतूर येथील २ अशा १३७ जणांचा समावेश असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.

प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालात जुना जालना भागातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या एका नामांकीत खासगी रुग्णालयातील चार कर्मचारी, नवीन जालना भागातील एक खासगी रुग्णालयातील १, भोकरदन येथील एक जवान आणि मंठा तालुक्यातील पेवा येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेला एकजण असे एकूण सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जालना जिल्ह्याने कोरोनाचे अर्धशतक पूर्ण केले असून, कोरोनाचा जिल्ह्यावरील विळखा अधिकच वाढत असल्याने आता जिल्ह्यातील जनतेसह जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

वाचा :जालना : एकाच कुटुंबातील तीन कोरोनाबाधित