होमपेज › Jalna › आग लावल्याने लिंबोणी येथील डाळिंबाची पन्नास झाडे जळाली

आग लावल्याने लिंबोणी येथील डाळिंबाची पन्नास झाडे जळाली

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 21 2018 10:50PMकुंभार पिंपळगाव : प्रतिनिधी 

घनसावंगी तालुक्यातील लिंबोणी येथील शेतकरी अविनाश विष्णू काळे यांच्या शेतात डाळिंब बागेच्या कुंपनास अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने जवळपास पन्नास झाडे जळाली. यात सुमारे 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

अविनाश काळे यांची लिंबोनी शिवारातील गट नंब 126 मध्ये 700 झाडांची डाळिंबाची बाग आहे. दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या या बागेस यावर्षी भरपूर फळे लागली आहेत. एक महिन्यात ही बाग काढणीस आली होती. एका झाडास जवळपास हजार ते दीड हजार रुपयांचे फळ  आहे. या बागेस रानडुकरांचा त्रास असल्याने शेतकरी काळे यांनी बागेला काटेरी कुंपन केले आहे. मात्र या कुंपनास बुधवारी (दि.18) अज्ञात व्यक्तीने आग लावून दिली. यात अविनाश काळे या शेतकर्‍यांचे साठ ते सत्तार हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Tags : Jalna, 50, trees, pomegranate, burnt, Limboni, fire