Tue, Apr 23, 2019 21:33होमपेज › Jalna › जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची ४३८ पदे रिक्‍त

जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची ४३८ पदे रिक्‍त

Published On: Apr 06 2018 1:30AM | Last Updated: Apr 06 2018 1:30AMजालना : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांची 438 पदे रिक्‍त असल्यामुळे विद्याथ्यार्र्ंचा पाया कच्चा राहात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एक अथवा दोन शिक्षक अनेक वगार्र्ंना शिकवीत असल्यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाच्या आयचा घो असाच प्रकार सुरू आहे. 

जालना जिल्हा शिक्षणाबाबत पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात तर जिल्हा परिषद शाळेतील परिस्थिती भयावह अशीच आहे. आठवी व नववीच्या अनेक विद्याथ्यार्र्ंना गुणाकार, भागाकार व इंग्रजीत स्वतःच्या नावाचे तसेच आडनावाचे स्पेलिंग लिहता येत नसल्याने शिक्षणाच्या बाबतीत आनंदी आनंद आहे. या परिस्थितीत जिल्ह्यातील मुख्याध्यापक, सहशिक्षक व प्राथकमिक पदवीधर शिक्षकांच्या मंजूर 6012 पदांपैकी 5 हजार 574 पदे भरलेली असून तब्बल 438 पदे रिक्‍त असल्याने शिक्षणाच्या अधोगतीत भरच पडली आहे.

रिक्‍त पदांमधे मुख्याध्यापकांच्या मंजूर असलेल्या 427 पैकी 71 पदे रिक्‍त आहेत. सहशिक्षकांचे 4418 पैकी  148 पदे रिक्‍त आहेत. तर प्राथमिक पदवीधर शिक्षकांचे 1167 पैकी 219 पदे रिक्‍त असल्याने एकच शिक्षक दोन ते तीन वगार्र्ंतील विद्याथ्यार्र्ंना ज्ञानदानाचे पवित्र काम करीत आहे. रिक्‍त पदांमुळे शैक्षणिक  दर्जा ढासळत चालला आहे. अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेतून नाव काढून पालक खासगी शाळांना पसंती देत आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात खासगी शाळांचे पेव मोठ्या प्रमाणावर फुटल्याचे चित्र दिसत आहे. खासगी शाळांची फीस अव्वाच्या सव्वा असतानाही पालकांची कुवत नसतानाही त्यांना ती भरावी लागत आहे.

ग्रामीण व शहरी भागात शिक्षकांची संख्या कमी असल्याने एकापेक्षा जास्त वर्गातील विद्याथ्यार्र्ंना शिकविताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मध्यंतरी जालना शहरात झालेल्या शिक्षण परिषदेत मान्यवरांंनी घसरणार्‍या शैक्षणिक दर्जाबाबत चिंता व्यक्‍त केली होती, मात्र चिंता व चिंतन करून हा प्रश्‍न सुटणार नसून, त्यासाठी शिक्षकांची रिक्‍त पदे भरण्याकडेही प्रशासनास लक्ष द्यावे लागणार आहे. नसता येणार्‍या काळात शाळा सोडणार्‍या विद्याथ्यार्र्ंची संख्या मोठी असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

 

Tags : Jalna, Jalna news, primary teacher, post, vacant,