Wed, Apr 24, 2019 19:30होमपेज › Jalna › औद्योगिक वसाहतीत ३ लाखांची चोरी

औद्योगिक वसाहतीत ३ लाखांची चोरी

Published On: Apr 18 2018 12:49AM | Last Updated: Apr 18 2018 12:49AMजालना : प्रतिनिधी

शहरातील औरंगाबाद रोडवर असलेल्या औद्योगिक वसाहतीतील राजेश जैन यांच्या घरातुन चोरट्यांनी 25 हजार रुपयांसह जवळपास अडीच लाखाचे सोन्याचे दागीने चोरुन नेले. चोरीच्या घटनेनंतर तेथील सुरक्षा रक्षक गायब असल्याने त्याच्या भोवती संशयाचे वलय फिरत आहे. विशेष म्हणजे चोरट्याने सीसीटीव्ही काढून घर साफ केले.

येथील औद्योगिक वसाहतीतील पाण्याच्या टाकीजवळ राजेश जैन यांची केमिकल इंडस्ट्रीज आहे. याच ठिकाणी ते राहतात. ते बाहेरगावी गेलेले असून ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरातून कपाटात ठेवलेले सोन्याचांदीच्या दागिन्यासह 25 हजारांची रोकड चोरून नेली.

सीसीटीव्ही कॅमेरा काढला

यावेळी चोरट्याने घरासमोर बसविलेला सीसीटीव्ही कॅमेरा काढून घेतला. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Tags : Jalna news,  industrial estates,  stolen, Girl, 3 lakhs,