Sun, Feb 17, 2019 02:57होमपेज › Jalna › जालना : तलावात बुडून ३ मुलींचा मृत्यू  

जालना : तलावात बुडून ३ मुलींचा मृत्यू  

Published On: May 20 2018 2:38PM | Last Updated: May 20 2018 2:38PMघनसावंगी (जि. जालना)  : प्रतिनिधी

घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील तलावात बुडून तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघींचा मृत्यू झाला तर तीन मुलींना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. ही घटना काल दुपारी १२ च्या दरम्यान घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील लघुसिंचन तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या सहा मुली तलावात पोहण्यासाठी उतरल्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने संगीता बजरंग रणमळे (वय. २२), सौमित्रा दत्ता सातपूते (वय. १६) जना भानूदास रणमळे (वय. १६) या तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. तर कल्याणी मधुकर खोस, ज्योती अशोक हेमके व अन्य एका मुलीला वाचविण्यात आले. बुडून मृत्यू झालेल्या मुलींचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले आहेत.