Sat, Apr 20, 2019 07:53होमपेज › Jalna › मराठा भवनासाठी २५ लाखांचा निधी

मराठा भवनासाठी २५ लाखांचा निधी

Published On: Jun 03 2018 1:13AM | Last Updated: Jun 02 2018 11:42PMपरतूर : प्रतिनिधी
सकल मराठा समाजबांधवांच्या पुढाकाराने चालू असलेल्या मराठा क्रांती भवनाच्या बांधकामासाठी परभणी लोकसभेचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आपल्या निधीतून पंचवीस लाख रुपयांच्या निधीबाबत पत्र दिले.
या बाबत परतूर सकल मराठा समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने या बांधकामाबाबत खासदार जाधव यांना माहिती दिली होती. सदरील मराठा क्रांती भवन हे मराठा बांधवांच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी उपयुक्त ठरणार आहे. याठिकाणी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, सुसज्ज वाचनालय व सभागृह अशा उपयुक्त सेवा असणारे मराठा क्रांती भवन उभारण्याचे काम जलदगतीने चालू आहे. 
यासाठी एक सामाजिक ऋण या भावनेने अनेकांनी या बांधकामासाठी आजवर मदत केली आहे. मराठा क्रांती भवनच्या कामाला जलदगती मिळावी व सखल मराठा बांधवांचे स्वप्न पूर्णत्वाकडे जावे या भावनेने खासदार जाधव यांनी पंचवीस लक्ष रुपयांचे पत्र दिले. या बाबत खासदार जाधव यांचे आभार शिष्टमंडळाने मानले.