Tue, Apr 23, 2019 09:57होमपेज › Jalna › २२५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

२२५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Published On: Mar 18 2018 1:45AM | Last Updated: Mar 22 2018 12:46PMकुंभार पिंपळगाव : प्रतिनिधी 

घनसावंगी तालुक्यात महावितरणची वीज वसुली मोहीम प्रभावीपणे राबविली जात असून कुंभार पिंपळगाव येथे थकीत वीज बिलांमुळे 225 ग्राहकांची वीज तोडण्यात आली. 

कुुंभार पिंपळगाव येथे गेल्या दोन महिन्यांपासून वीज वितरण कंपनीची थकीत वीजबिल वसुली मोहीम जोरात सुरू आहे. मार्च एन्डिगमुळे ही मोहीम अधिक कडक करण्यात आली आहे. मार्च महिन्यात येथील 225 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून या ग्राहकांकडे जवळपास एक लाख पंचवीस हजार रुपयांची वीजबिलाची थकबाकी आहे. ज्या ग्राहकांकडे 10 हजार  व पाच हजार रुपयांची थकबाकी आहे अशा ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. कुंभार पिंपळगाव येथे थकबाकीत असलेले 453 ग्राहक आहेत. त्यांच्याकडे चाळीस लाख 24 हजार थकबाकी आहे. 

3 लाख 50 हजारांची वसुली 

महवितरणने थकीत वीजबिल न भरणार्‍या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. काही ग्राहकांचे वीज मीटर काढून घेण्यात येत आहे. थकबाकीदार ग्राहकांनी मार्चएन्ड असल्याने लवकारात लवकर वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे  - सचिन बनकर, सहायक अभियंता

 

Tags : jalna, Kumbhar Pimpalgaon, Electricity, power supply, breaks,