Tue, Jun 18, 2019 22:20होमपेज › Jalna › १२५७ उमेदवारांनी  दिली लेखी परीक्षा  

१२५७ उमेदवारांनी  दिली लेखी परीक्षा  

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 07 2018 1:40AMजालना : प्रतिनिधी

येथील पोलिस भरती कवायत मैदानावर शुक्रवारी (दि.6)  1312 उमेदवारांपैकी 1257 उमेदवारांनी लेखी दिली. या परीक्षेसाठी महाराष्ट्रात प्रथमच जालन्यात ड्रोन कॅमेर्‍याचा वापर करण्यात आला. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात होते. पोलिस शिपायांच्या 50 पदांसाठी भरतीसाठी 6 हजार 226 उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. त्यापैकी 6 हजार 901 उमेदवारांची मैदानी चाचणी 12 ते 23 मार्चदरम्यान  घेण्यात आली होती. मैदानी चाचणीच्या गुणांच्या आधारे प्रवर्गनिहाय एका जागेस 15 या प्रमाणात अंतिम गुणांवरील 1312 उमेदवार लेखी चाचणीसाठी पात्र ठरले. या उमेदवारांची लेखी चाचणी शुक्रवारी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी सुरू झाली. पोलिस परेड मैदानावर एकाच वेळी उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. यावेळी उमेदवारांकडून कॉपीसारखा प्रकार होऊ नये, यासाठी ड्रोन कॅमेर्‍याद्वारे संपूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवण्यात येत होती. परीक्षेपूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे स्वतः उमेदवारांची  झडती घेतली. 

राज्यात प्रथमच जालना येथे पोलिस भरतीसाठी ड्रोन कॅमेर्‍याचा वापर करण्यात आल्याने ही परीक्षा सवार्र्ंसाठी कुतूहलाचा व चर्चेची बनली होती. लेखी परीक्षेपूर्वी  पात्र उमेदवारांना महाऑनलाइनमार्फत प्रवेशपत्र पाठविण्यात आले होते. उमेदवारांना  प्रवेशपत्र व ओळखपत्र (मतदान  कार्ड, आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, )बंधनकारक करण्यात आले होते. ओळखपत्राशिवाय कोणासही प्रवेश देण्यात आला नाही. लेखी परीक्षेसाठी अप्पर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिह गौर यांच्यासह कदीम जालना, तालुका जालना, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकासह अधिकारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. 

Tags : Jalna, 1257, candidates,  written, test