Sat, Jul 20, 2019 10:36होमपेज › Jalna › पावसाची दडी; 1 लाख हेक्टरवरील पिके धोक्यात

पावसाची दडी; 1 लाख हेक्टरवरील पिके धोक्यात

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jul 01 2018 12:33AMजालना : प्रतिनिधी

पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील 1 लाख 36 हजार हेक्टरवरील पेरणी धोक्यात आली आहे. दरम्यान, येत्या आठ  दिवसांत  दमदार पाऊस न पडल्यास शेतकर्‍यांवर भयावह संकट कोसळण्याची भीती वर्तविली जात आहे. 

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत हवामान विभागाच्या चांगल्या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकर्‍यांनी या वर्षी अपुर्‍या पावसावर 5 लाख 12 हजार 46 हेक्टरपैकी 1 लाख 36 हजार 609 हेक्टर वर शेतकर्‍यांनी पेरणी केली. गतवर्षी पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या. त्यातच बोंडअळीमुळे कपाशीचे पीक हातातून गेल्याने शेतकरी हतबल झाला होता.या वर्षी खरिपाची पेरणी करावयाची कशी हा प्रश्‍न सतावत होता. यावर्षी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज  वर्तविण्यात आला होता.