Thu, Sep 19, 2019 03:26होमपेज › Jalna › आणि जालन्यात चक्क रस्ताच गेला वाहून! (video)

आणि जालन्यात चक्क रस्ताच गेला वाहून! (video)

Published On: Jun 30 2019 8:10PM | Last Updated: Jun 30 2019 8:18PM
जालना : पुढारी ऑनलाईन

राज्यात मान्सूनने गेल्या दोन दिवसांपासून धुवाँधार हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्येही पावसाने दमदार सुरूवात केली आहे. या पावसात जालन्यातील चक्क रोडच वाहून गेल्याची घटना घडली. हवामान विभागाने पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.   

गेल्या दोन दिवसापासून अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जून महिना कोरडा गेला असला, तरी महिन्याच्या शेवटी पावसाने धुवाँधार एन्ट्री करत अक्षरश: दाणादाण उडवून दिली आहे. मुंबईमध्ये तर लोकल तसेच वाहतुकीची मोठी कोंडी झाली. तर महाराष्ट्रातील धरणसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे.