Fri, Mar 22, 2019 23:50होमपेज › International › तब्बल ४० हजार मानवी हाडांपासून बांधले हे चर्च!

तब्बल ४० हजार मानवी हाडांपासून बांधले हे चर्च!

Published On: Aug 10 2018 2:01PM | Last Updated: Aug 10 2018 2:09PMप्राग(झेक प्रजासत्ताक): पुढारी ऑनलाईन

चर्च म्हंटले की, सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली इमारत नजरेसामोर येते. जगात अनेक चर्च आहेत जे विविध रंगाच्या विद्युत रोषणाई, फुलांनी सजवलेली पाहिली आहेत. पण मानावाच्या हाडांपासून बांधलेले चर्च म्हंटल्यावर तुम्हाला पटणार नाही. पण खरंच जगात असेदेखील चर्च आहे.

युरोपीय देश असलेल्या झेक प्रजासत्ताक देशाची राजधानी प्रागमध्ये असे चर्च बांधण्यात आले आहे. हे चर्च बांधण्यासाठी तब्बल ४० हजार मानवी हांडाचा वापर केला आहे. जगातील पहिलेच असे चर्च असुन याचे नाव सेडलेक ओसुरी असे आहे. ओसुरी या शब्दांचा अर्थ चलविचल असा आहे. हे चर्च मानवी हाडांपासून बांधण्यामागचा इतिहास देखील तितकाच रंजक आहे.

मानवी हाडांचे बनलेल्या चर्चचा इतिहास

तेराव्या शतकात संत हेनरी पवित्र भूमि  मानले जात असलेल्या पलेस्टीना या शहरात गेले होते. परतीच्या प्रवासावेळी हेनरी यांनी  प्रभु येशु यांना ज्या ठिकाणी क्रुसावर चढवण्यात आले होते त्याठिकाणाची माती घेऊन आले. हेनरी यांनी ती माती एका ठिकाणी टाकली त्यांनंतर ते ठिकाण दफन करण्यासाठी प्रसिद्ध झाले.

 

 ऐसा ही इंसानी हड्डियों से बना एक चर्च चेक गणराज्य में स्थित है. इस चर्च के सेडलेक ऑस्युअरी में करीब 40 हजार लोगों की हड्डियों को कलात्मक रूप से सजाया गया है.

पंधराव्या शतकात युद्धाच्या दरम्यान तेथे प्लेगची साथ पसरली होती. त्यामध्ये लाखों लोकांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह दफन करण्यासाठी जागा अपुरी पडली तेव्हा  तेथील लोकांनी मृतदेह ठेवण्यासाठी एक ऑस्युअरी(चर्च) बांधण्याचा विचार केला. या ऑस्युअरीमध्ये मृतदेह ठेवण्याची जबाबदारी संत आणि पादरी यांच्याकडे सोपवण्यात आली. 

Image result for द चर्च ऑफ बोन्स

Related image

१८७० मध्ये हे चर्च तब्बल ४० हजार मानवी हांडापासून सजवण्यात आले. या मानवी हाडांपासून बांधण्यात आलेल्या चर्चला "द चर्च ऑफ बोन्स" या नावाने देखील संबोधले जाते. 

Related image