Sat, Jul 04, 2020 15:05होमपेज › International › इटलीमध्ये का होत आहेत कोरोनाने इतके मृत्यू?

इटलीमध्ये का होत आहेत कोरोनाने इतके मृत्यू?

Last Updated: Mar 30 2020 11:40AM
रोम : पुढारी ऑनलाईन 

कोरोना विषाणूचा कहर जगभरात थांबता थांबेनासा झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत ९ हजारहून अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ८० हजारहून अधिक लोक संक्रमित आहेत. हा आकडा जगातील अन्य कुठल्याही देशाच्या तुलनेत जास्त आहे. इटलीमध्ये काल (ता.२९) एका दिवसात तब्बल ७५६ जणांचा मृत्यू झाला.

येथील वाढता आकडा पाहता परिस्थिती बिकट झालेली पाहायला मिळत आहे. इटलीमध्ये लावण्यात आलेली इमरजन्सी ३ एप्रिलला संपुष्टात येत आहे. त्याआधीच लोक सामान्य जीवन जगत असतील, असे इटलीचे पंतप्रधान जिसेप कोन्टे यांनी देशाला सांगितले आहे. परंतु, ज्याप्रकारे इटलीमध्ये मृत्यूची संख्या वाढत आहे, त्यावरून येथील परिस्थिती कमी वेळात पूर्वपदावर येईल, असे वाटत नाही. 

इटलीतील लोम्बार्डी प्रांतात एका दिवसात ५४१ जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीत अशी परिस्थिती ओढावली आहे की, शवगृहे मृतदेहांनी खचाखच भरले आहेत. परंतु, कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे इटलीमध्ये मृत्यूचा आकडा इतक्या वरच्या स्तरावर कसा पोहोचला? यूरोपमध्ये कुठल्याही इतर देशाच्या तुलनेत कोरोना विषाणू इटलीमध्ये गतीने पसरत आहे आणि विषाणूने आतापर्यंत ९ हजारांहून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. 

इटलीमध्ये कोरोना संक्रमणाची सुरूवात २० फेब्रुवारीला झाली. जेव्हा एका ३८ वर्षीय व्यक्तीने लोम्बार्डीच्या कोडोग्नो कस्बामध्ये आपली तपासणी करून घेतली. जेव्हा रिपोर्ट आला, तेव्हा ही व्यक्ती कोरोना विषाणू पॉझिटिव्ह आढळला. हा इटलीची पहिला कोविड-१९ केस होती.

इटालियन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमधील डिपार्टमेंट ऑफ इन्फेक्शियस डिसीजच्या एका संशोधकाच्या माहितीनुसार, इटलीमध्ये हा विषाणूचा प्रवेश खूप आधीच झाला होता. ज्यावेळी आम्ही इंफ्लुएंजाशी दोन हात करत होतो, त्याचवेळी याचा फैलाव होत होता.

वाचा - इटलीसारखे तांडव टाळायचं असेल, तर आपल्याला 'हे' करावचं लागेल!

इटलीमध्ये पहिली केस समोर येण्याआधी देशाच्या उत्तर भागात न्यूमोनियाची अनेक प्रकरणे समोर आली होती. कारण, लोम्बार्डीतील  कोडोग्नो गावातील रूग्णालयातं अशी अनेक प्रकरणे समोर आली होती, ज्यामध्ये लोकांना न्युनोनिया झाला होता. असं होऊ शकतं की, जे लोग उपचारासाठी आले होते, ते विषाणूने बाधित असतील आणि त्यांच्यावर फ्लू वा निमोनिया पीडित समजून उपचार केला गेला असेल? अशा परिस्थितीत हे लोक विषाणूच्या फैलावाचे कारण असू शकतात. 

वाचा -डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला सर्वांत मोठा इशारा!