Sun, Oct 20, 2019 12:14होमपेज › International › लडाखमध्ये चिनी सैनिकांची घुसखोरी?

लडाखमध्ये चिनी सैनिकांची घुसखोरी?

Published On: Jul 12 2019 5:27PM | Last Updated: Jul 12 2019 5:37PM

संग्रहित छायाचित्रचिनी सैन्य ६ जुलैला डेमचोक, कोयूल आणि डुंगटी परिसरात आले. यावेळी भारतीय भूमीवर चीन झेंडा फडकावण्याचा उद्योग झाल्याचेही समजते. लडाखमध्ये काही बौद्ध धर्मगुरुंकडून दलाई लामांचा वाढदिवस  साजरा केला जात असताना चिनी सैनिक पोहोचले आणि त्यांनी कार्यक्रम थांबवला. 

लडाख : पुढारी ऑनलाईन

कुरापती काढण्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या चीनने पुन्हा कुरघोडी केली आहे. लडाखमध्ये तब्बल सहा किमी आत चिनी सैनिकांनी घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. एका वृत्तवाहिनीने एका फोटोच्या सहाय्याने हा दावा केला आहे. 

दरम्यान, भारतीय लष्कराकडून घुसखोरी झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. काही चिनी सैनिक साध्या ड्रेसमध्ये आणि खासगी वाहनाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक आले,पण ते त्यांच्या भूमीवर होते, अशी माहिती भारतीय लष्करांच्या सूत्रांनी दिली आहे. ज्यावेळी चिनी सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक होते त्यावेळी काही लोक दलाई लामांचा वाढदिवस साजरा करत होते. 

चिनी सैन्य ६ जुलैला डेमचोक, कोयूल आणि डुंगटी परिसरात आले. यावेळी भारतीय भूमीवर चिनी झेंडा फडकावण्याचा उद्योग झाल्याचेही समजते. लडाखमध्ये काही बौद्ध धर्मगुरुंकडून दलाई लामांचा वाढदिवस  साजरा केला जात असताना चिनी सैनिक पोहोचले आणि त्यांनी कार्यक्रम थांबवला. 

चिनी सैन्यांकडून घुसखोरी झाल्याची माहिती एका माजी खासदाराने महिला सरपंचांनी पाठवलेल्या छायाचित्रावरून दिली. माजी खासदार रेगजिन या प्रकरणी अधिक माहिती देताना सांगितले, की चीन नेहमीच घुसखोरी करण्याचे धाडस करत आहे. या संवेदनशील मुद्याची सरकारला माहिती असूनही कोणतीच कार्यवाही केली जात नाही. माध्यमांनी सुद्धा कोणतीही भूमिका मांडलेली नाही.

आतापर्यंत तीन ते चारवेळा असा प्रकार पाहिल्याचे रेगजिन यांनी सांगितले. त्यामुळे चिनी सैन्याच्या घुसखोरीवर गांभिर्याने लक्ष देऊन कठोर उपाययोजना केली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.