Tue, Aug 20, 2019 15:30होमपेज › International › श्रीलंका हल्ला : राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून निषेध

श्रीलंका हल्ला : राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून निषेध

Published On: Apr 21 2019 4:12PM | Last Updated: Apr 21 2019 4:27PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

'ईस्टर संडे'च्या पवित्र दिवशी साखळी बॉम्बस्फोटांनी श्रीलंकेची राजधानी कोलंबो हादरली. या स्फोटातील मृतांची संख्या १८७ च्या वर गेली असून ४०० हून अधिक जखमी आहेत. या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच या काळात भारत भक्कमपणे श्रीलंकेच्या पाठिशी असल्याचे म्हटले आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करून हल्ल्याचा निषेध केला. "भारत श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध करतो तसेच सरकार आणि जनतेच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. निर्दोष लोकांना अशा बुद्धीहिनांकडून हिंसेद्वारे मारण्याला सभ्य समाजात कोणताही थारा नाही. आम्ही श्रीलंकेच्या सोबत पूर्ण ताकदीने उभे आहोत," असे राष्ट्रपतींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

श्रीलंका में हुए आतंकवादी हमले की भारत कड़ी निंदा करता है और श्रीलंका के लोगों तथा सरकार को अपनी संवेदना प्रेषित करता है। निर्दोष लोगों के साथ की गई ऐसी क्रूर हिंसा का, सभ्य समाज में कोई स्थान नहीं है। हम, संकट की इस घड़ी में पूरी दृढ़ता से श्रीलंका के साथ हैं —राष्ट्रपति कोविन्द

— President of India (@rashtrapatibhvn) April 21, 2019

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे की, "ईस्टर संडेच्या पवित्र दिवशी कोलंबोत झालेल्या स्फोटाचे बळी ठरलेले निरपराध लोक आणि नातेवाईकांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. या पवित्र दिवशी असल्या भयंकर हिंसने स्तब्ध झालो आहे."तसेच त्यांनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "या दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना करतो. या दु:खद प्रसंगी ईश्वर जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना धैर्य आणि धाडस देवो."

ईस्टर रविवार के पवित्र अवसर पर कोलंबो में हुए धमाकों में हताहत मासूम नागरिकों और उनके परिजनों के प्रति हार्दिक संवेदना व्यक्त करता हूं। इस पावन अवसर पर इस विक्षिप्त हिंसा पर स्तब्ध हूं।#SriLanka #SriLankaBlasts

— VicePresidentOfIndia (@VPSecretariat) April 21, 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी

या बॉम्बहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट केले आहे. "श्रीलंकेत झालेल्या भयानक स्फोटांचा तीव्र निषेध. अशा घृणास्पद कृत्यांना आमच्या भूमीवर थारा नाही. भारत श्रीलंकेच्या लोकांसोबत मजबुतीने उभा आहे. हल्ल्याचा बळी ठरलेल्या लोकांच्या सोबत माझ्या सहवेदना असून जखमींसाठी मी प्रार्थना करतो."
दरम्यान, या भीषण हल्ल्यानंतर बचाव कार्याला वेग आला आहे. शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला असून इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. 

Strongly condemn the horrific blasts in Sri Lanka. There is no place for such barbarism in our region. India stands in solidarity with the people of Sri Lanka. My thoughts are with the bereaved families and prayers with the injured.

— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) April 21, 2019