Fri, Nov 24, 2017 19:59होमपेज › International › ‘पीओके’मधील नागरिकांना पाकमध्ये राहायचे नाही

पाक व्याप्त काश्मीरमध्ये वृत्तपत्रांवर बंदी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांना पाकिस्तानमध्ये राहायचे नाही, असे मत व्यक्‍त केले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील सर्वाधिक खपाच्या ‘डेली मुजादाला’ वृत्तपत्राने याबाबतचा एक सर्व्हे केला होता. त्यामध्ये ही बाब पुढे आली आहे. 

एका वृत्तवाहिनीने या वृत्तपत्रातील सर्व्हेचीही माहिती दिली आहे. ‘डेली मुजादाला’तर्फे पाच वर्षांपासून हा सर्व्हे केला जात आहे. यामध्ये 10 हजार नागरिकांनी सहभाग घेतला. त्यातील 73 टक्के नागरिकांना आपणाला पाकिस्तानमध्ये राहायचे नाही, असे मत व्यक्‍त केले आहे. या वृत्तपत्राचे संपादक हारिस क्‍वादर यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, आम्ही पाकव्याप्त नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी हा सर्व्हे केला होता. ज्यामध्ये सर्वाधिक लोकांनी पाकिस्तानमध्ये न राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. मुळात हा सर्व्हे करतानाच आम्ही पाक व्याप्त काश्मीरमधील नागरिक येथे राहण्यास तयार आहेत का, या द‍ृष्टीने प्रश्‍न विचारले होते, असे क्‍वादर यांनी सांगितले. 
गत काही महिन्यांमध्ये पाकव्याप्‍त काश्मीरमध्ये पाकिस्तान सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे. येथे चीनच्या मदतीने होणार्‍या आर्थिक कॉरिडॉरलाही नागरिकांनी विरोध केला आहे. पाकिस्तान सरकारकडून आमच्यावर अन्याय होत असल्याचेही येथील नागरिकांनी सांगत वारंवार आंदोलनाचा झेंडा हातात घेतला आहे. 

वृत्तपत्र स्वातंत्र्याची मुस्कटदाबी
अशा प्रकारचा सर्व्हे घेतल्याच्या कारणातून ‘डेली मुजादाला’वर पाकिस्तान सरकारने कारवाई केली आहे. हे वृत्तपत्रच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वृत्तपत्राचे कार्यालय सील करण्यात आले आहे, अशी माहिती संपादक हारिस क्‍वादर यांनी दिली.