Fri, Nov 24, 2017 19:58होमपेज › International › पनामागेट : शरीफ यांच्‍याविरोधात सुनावणी सुरु

पनामागेट: शरीफ यांच्‍याविरोधात सुनावणी सुरु

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

इस्‍लामाबाद : पुढारी ऑनलाइन वृत्त 

पनामा पेपर गेटप्रकरणी वादात सापडलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्‍या कुटुंबाच्‍या संपत्तीप्रकरणी पाकिस्‍तानच्‍या सर्वोच्‍च न्‍यायालयात आजपासून सुनावणी सुरु होत आहे. याचदरम्‍यान, पाकिस्‍तानच्‍या विरोधी पक्षाच्‍या नेत्‍यांनी नवाज शरीफ यांच्‍या राजीनाम्‍याची मागणी केली आहे. तसेच यावेळी शरीफ यांच्‍या विरोधात निदर्शने होण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 
सुनावणीचा आजचा पहिला दिवस आहे. ज्‍वाइंट इन्‍वेस्‍टिगेशन टीम (जेआयटी)ने केलेल्‍या खुलास्‍यानंतर याप्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालय प्रथमच सुनावणी करत आहे. शरीफ यांच्‍यासाठी हा खूप महत्त्‍वाचा दिवस आहे.   

शरीफ कुटुंबाच्‍या संपत्तींवर ज्‍वाइंट इन्‍वेस्‍टिगेशन टीमने आपल्‍या अहवालात अनेक आरोप लावले आहेत. परदेशातील बनावट कंपन्‍यांमध्‍ये आपली संपत्ती गुंतवल्‍याचा आणि बनावट कागदपत्रे सादर केल्‍याचा आरोप जेआयटीने शरीफ कुंटुंबावर केला आहे. 

शरीफ यांनी लंडनमध्‍ये संपत्ती खरेदी केली होती. ही संपत्ती शरीफ यांच्‍या कुटुंबीयांच्‍या मालकीची होती. या संपत्तीचा खुलासा गत वर्षी पनामा पेपर लीक झाल्‍यानंतर झाला होता. 

सहा सदस्‍यीय जेआयटीने १० जुलैला सर्वोच्‍च न्‍यायालयात आपला अहवाल सादर केला होता. यादरम्‍यान, पनामा गेट आणि नवाज शरीफ यांच्‍या संपत्तीप्रकरणी ज्‍वॉईंट इन्‍वेस्‍टिगेशन टीम (जेआयटी)चा अहवाल नाकारण्‍यात यावा, अशी विनंती पाकिस्तानचे वित्तमंत्री इशाक डार यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयाकडे केली आहे. 

दरम्‍यान, जेआयटीच्‍या अहवालासंदर्भात शरीफ यांनी पक्षाच्‍या इतर सदस्‍यांसमवेत चर्चा केली असून माझ्‍याविरोधात मोठे षड्‍यंत्र असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे. शरीफ यांच्‍या पक्षाने या अहवालामागे परदेशी तत्‍वांचा हात असल्‍याचे म्‍हटले आहे. 

जेआयटीने आपल्‍या अहवालामध्‍ये नवाज शरीफ यांच्‍या विरोधात १५ प्रकरणे पुन्‍हा उघड करण्‍याची शिफारस केली आहे. ही प्रकरणे तथाकथित मनी लॉन्‍ड्रिंगशी संबंधित आहेत. या कालावधीत शरीफ पाकिस्‍तानचे दोन वेळा पंतप्रधान होते.