Thu, Dec 12, 2019 08:35होमपेज › International › अमेरिका दौर्‍यात पाक पंतप्रधानांचे साधे स्‍वागतही नाही 

अमेरिका दौर्‍यात पाक पंतप्रधानांचे साधे स्‍वागतही नाही 

Published On: Jul 21 2019 4:28PM | Last Updated: Jul 21 2019 4:30PM
वॉशिग्‍टन : पुढारी ऑनलाईन

पाकिस्‍तानचे पंतप्रधान झाल्‍यावर इम्रान खान हे आपल्‍या पहिल्‍या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. इम्रान खान अमेरिकेला पोहचल्‍यावर त्‍यांच्या स्‍वागतासाठी अमेरिकेचा कोणताही मोठा अधिकारी उपस्‍थित नव्हता. यावरून सोशल माध्यमांतून त्यांची खिल्ली उडवण्यात येत आहे. दरम्‍यान इम्रान यांनी अमेरिकेला येण्यासाठी कतार एयरवेजची सामान्य कमर्शीयल फ्लाइट घेतली. तसेच आपल्‍या तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौर्‍याचा खर्च कमी करण्यासाठी ते पाकिस्‍तानच्या अमेरिकेतील राजदूतांच्या घरीच थांबणार आहेत. . 

इम्रान यांच्या अमेरिकेच्या दौर्‍यात पोहचल्‍याचा व्हिडीओ ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर अनेक युजर्सनी कॉमेंट दिल्‍या आहेत. अनेकांनी इम्रान खान यांच्यासोबतची ही वाईट वागणूक असल्‍याचे म्‍हटले आहे, तर काहींनी यावर वर्ल्डकपमधील हाराकीरीचा बदला म्‍हटले आहे. पीटीआयने शेअर केलेल्‍या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, इम्रान खान हे सामान्य प्रवाशांसारखे फ्‍लाईटमधून बाहेर पडले. 

उमर अब्‍दूल्‍ला यांनी केली प्रशंसा...

पाकिस्‍तानच्या पंतप्रधानांना ट्रोल करणार्‍यांचा उमर अब्‍दुल्‍ला यांनी चांगलाच समाचार घेतला. अब्‍दुल्‍ला यांनी ट्‍वीट करत, इम्रान खान यांनी आपल्‍या देशाचा पैसा वाचवला आहे. ते इतर नेत्‍यांप्रमाणे आपल्‍या सोबत अहंकार घेवून चालत नाहीत, असे म्‍हटले आहे. 

सोमवारी ट्रंप यांच्यासमवेत इमरान खान दुपारचे जेवण घेणार 

या दौर्‍यात इमरान खान यांची अमेरिकेचे राष्‍ट्रपती डोनाल्‍ड ट्रंम्‍प यांच्यासोबत चर्चा होणार आहे. दोन्ही देशांमध्ये रक्षा, व्यापार आणि कर्ज अशा अनेक मुद्‍यांवर चर्चा होण्‍याची शक्‍यता आहे. सोमवारी दोन्ही नेते एकत्र जेवणही करणार आहेत. यानंतर दोन्ही नेत्‍यांमध्ये बैठक होणार आहे. 

अमेरिकेत आल्‍यावर इमरान हे अमेरिकेतील पाकिस्‍तानचे राजदूत अजद मजीद खान यांच्या निवासस्‍थानी थांबले आहेत. विमानतळावर त्‍यांच्या स्‍वागतासाठी विदेश मंत्री शाह महमूद कुरेशी उपस्‍थित होते. यावेळी मुळच्या  पाकिस्‍तानी असलेल्‍या अनेक लोकांनी त्‍यांचे स्‍वागत केले. याआधी पाकिस्‍तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी २०१५ साली अमेरिकेचा दौरा केला होता.