Wed, Jul 08, 2020 19:26होमपेज › International › किम जोंग यांनी जनरलला फेकले हिंस्र माशांच्या तलावात

किम जोंगनी 'त्यांना' फेकले हिंस्र माशांच्या तलावात

Published On: Jun 12 2019 11:47AM | Last Updated: Jun 12 2019 1:17PM
सेऊल : पुढारी ऑनलाईन

उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांनी आपल्या जनरलची नरभक्षी पिरान्हा माशांच्या तलावात फेकून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नुकतेच जोंग यांनी अमेरिकेत आपल्या दुतांसह पाच अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. जनरलवर किम जोंग यांच्या विरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप होता. ही माहिती जोंग यांना कळताच त्यांनी जनरल याची निर्घृण प्रकारे हत्या केली. मात्र जनरलच्या नावाचा खुलासा झालेला नाही. 

जनरलवर किम जोंग यांच्या विरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप होता. त्यामुळे जोंग यांनी पिरान्हा या हिंस्र माशांच्या तलावात जनरल यांना फेकले. याबाबत सांगण्यात येत आहे की, तलावात फेकण्यापूर्वी जनरलचे हात आणि पाय तोडण्यात आले होते. तलाव पूर्ण हिंस्र माशांनी भरला होता. त्यामुळे जनरल यांना माशांच्या हल्ल्यानंतर मारले. त्यांच्यावर चाकूने हल्ला केला की त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे, याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, किम जोंग उन यांनी ब्राझीलवरुन पिरान्हा माशांची खरेदी केली होती. पिरान्हा मासा हा जगातील सर्वात नरभक्षी आणि हिंस्र मासा आहे. या माशांच्या दातांना खूप धार असते. या दातांनी ते एका माणसाला कापू शकतात. माणसांसाठी हा मासा धोकादायक आहे.

१९६५ ला प्रदर्शित झालेला आय जेम्स बॉन्डचा 'यू ओनली लिव ट्वाइस' चित्रपटातील एका घटनेने असे कृत्य करण्यास किम जोंग यांना प्रेरणा मिळाली असल्याचा दावा तेथील सुत्रांनी केला आहे. किम जोंग हे आपल्या सहकाऱ्यांना खास संदेश देण्यासाठी निर्घृण हत्येच्या पद्धतीचा वापर करतात. 

 किम जोंग यांनी आपल्या घरातील काही सदस्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांनाही मारुन टाकले आहे. याचे कारण असे की, जोंग यांच्या भाषणावेळी त्यांनी टाळ्या वाजवल्या नव्हत्या. या छोट्याश्या कारणामुळे त्यांनी आपल्या जवळील लोकांना मृत्यूदंड दिला होता, असे म्हटले जाते.