Sun, Jul 05, 2020 23:36होमपेज › International › कोरोनामुक्त झाले वुहान; पण, जगाला बसलेला कोरोनाचा विळखा सुटेना!

कोरोनामुक्त झाले वुहान; पण, जगाला बसलेला कोरोनाचा विळखा सुटेना!

Last Updated: Jun 05 2020 8:02PM

file photoबिजिंग : पुढारी ऑनलाईन

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. जगातील सध्या ६७ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाने विळखा घातला आहे. तर आतापर्यंत ३ लाख ९३ हजार ७६० लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मात्र, चीनमधील ज्या वुहान शहरातून कोरोना व्हायरस जगभर पसरला ते वुहान आता कोरोनामुक्त झाले आहे.

वाचा : देशात एका दिवसात २७३ जणांचा कोरोनाने मृत्यू; सर्वांधिक १२३ मृत्यू एकट्या महाराष्ट्रात!

वुहानमधील कोरोनाचे शेवटचे तीन रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे वुहानमध्ये आता कोरोनाचा एकही रुग्ण नाही, असे चीनच्या सरकारी मीडियाने वृत्त दिले आहे.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये काल गुरुवारी पाच रुग्ण आढळून आले. यात शांघायमधील ४ आणि सिचुआन प्रांतातील एका रुग्णाचा समावेश आहे. मात्र, वुहानमध्ये आता एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही.

वाचा : चिंता वाढवणारा कोरोनाग्रस्त भारत, २ दिवसांत २५ हजार नवे रुग्ण 

चीनमध्ये एकूण ८३,०२७ जणांना कोरोनाची बाधा झाली. यातील अद्याप ६६ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ७८,३२७ रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर चीनमध्ये ४,६३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हुबेई प्रांताच्या राजधानीचे ठिकाण असलेल्या वुहानमधील तीन शेवटच्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २४ तासांत त्यांची दोन वेळा चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

वाचा : अनलॉक होत असतानाच कोरोनाचा उद्रेक सुरुच

हुबेई प्रांताला कोरोनाचा सर्वांधिक फटका बसला. येथे कोरोनाचे ६८,१३५ रुग्ण आढळून आले. यातील ६३,६२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर ४,५१२ लोकांचा मृत्यू झाला. वुहानमधील १ कोटी लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून येथे नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे येथे आता कोरोनाचा धोका कमी झालेला आहे, असे चीन सरकारचे अधिकृत वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने वृत्तात म्हटले आहे.

वुहानमधून कोरोना व्हायरस जगभर पसरला. आता येथे पुन्हा प्राण्यांचे बाजार उघडले आहेत. विशेष म्हणजे, जिवंत प्राणी विकणाऱ्या लोकांनी आपली दुकाने पुन्हा उघडली आहेत. परंतु, हा बाजार आधीच्या बाजारापासून थोड्या दूर अंतरावर आहे. ज्या बाजारातून कोरोना व्हायरसचा फैलाव झाला होता, त्याचे नाव द वुहान आन सीफूड होलसेल मार्केट असे आहे. 

वाचा : दिल्ली मेट्रोचे तब्बल २० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह