Fri, Jun 05, 2020 21:25होमपेज › International › चीनच्या नाकात दम आणलेला २३ वर्षाचा 'बहाद्दर' आहे तरी कोण? 

चीनच्या नाकात दम आणलेला २३ वर्षाचा 'बहाद्दर' आहे तरी कोण? 

Published On: Aug 14 2019 2:54PM | Last Updated: Aug 14 2019 2:55PM

जोशुआ वॉन्गहाँग काँग : पुढारी ऑनलाईन 

हाँगकाँग आणि चीनमध्ये एका अवघ्या २३ वर्षाच्या युवकाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे हा बहाद्दर आहे तरी कोण ? अशी चर्चा रंगली आहे. त्याला कारणीभूत हाँगकाँगमधील प्रस्तावित विधेयक आहे. 

हाँगकाँगमधील आंदोलकांवर चीनमध्ये खटला चालवण्यासाठी विधेयक मांडण्यात आले होते. या विधेयकावरून हाँगकाँगमध्ये चांगलेच रणकंदन माजले आहे. या विधेयकाविरोधात हाँग काँगमधील एका सामान्य जोशुआ वॉन्ग या २३ वर्षीय मुलाच्या आंदोलनाने चीन देशातील प्रशासनाला आव्हान दिले आहे. विशेष बाब म्हणजे याच वयोगटातील आंदोलन  करणारे युवक आहेत. 

तरुण आंदोलकांनी शक्तिशाली चीनला चांगलेच धारेवर धरले आहे. जोशुआ वॉन्ग ची-फंगच्या डोमेसिस्टो पक्षातील नेते आणि वय सरासरी २० ते २५ वयोगटातील आहेत. डोमेसिस्टो पक्षातील नेत्यामध्ये एग्नेश चॉ (वय २२) आणि नाथन लॉ (वय २६) यांचाही समावेश आहे. 

विधेयकाला विरोध सुरू केल्यानंतर जोशुआ वॉन्ग आंदोलन कर्त्यांना घेवून रस्त्यावर उतरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोट्यवधी लोक हाँगकाँगच्या रस्त्यावर निदर्शने करीत आहेत. हाँगकाँगच्या विमानतळावर उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय सोमवारी (दि. १३) रोजी आंदेलनकर्त्यानी हाँगकाँगच्या प्रमुख विमान तळावर कब्जा केला. त्यामुळे तेथून एकाही विमानाने उड्डाण केले नाही. याशिवाय एअर इंडियानेही सर्व विमाने रद्द केली. हाँगकाँगमध्ये चीनविरूद्ध जोरदार निषेधाचे नेतृत्व तेथील तरुण लोक करत आहेत.    

आंदोलन कर्त्याची मागणी 

चीनमध्ये खटला चालवण्यासाठी विधेयक सादर करण्यात आले तेव्हा हाँगकाँगच्या तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली. या विधेयकाने  हाँगकाँगच्या तरुणांना चीनमधील कम्युनिस्ट पक्ष या विधयकामुळे आपल्यावर वर्चस्व गाजवण्याच्या प्रयत्नात असल्याचे वाटते. हाँगकाँग हा चीनचा एक भाग असूनही त्याला स्वतंत्र प्रशासकीय विभागाचा दर्जा आहे. 

जोरदार निषेधाच्या पार्श्वभूमीवर हाँगकाँगच्या सरकारने हे विधेयक मागे घेतले, परंतु या भागातील निषेध अजूनही संपलेला नाही. हाँगकाँगमध्ये लोकशाही हक्क पुर्ववत करण्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. 

आंदोलन कर्त्याचा नेता कोण?

हाँगकाँगमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी झटत असलेला डेमोसिस्टो पक्षाचा जोशुआ वॉन्ग ची-फंग सरचिटणीस आहे. राजकारणात येण्याआधी त्याने स्टुडेंट ग्रुप स्कॉलरिझमची स्थापना केली. तसेच २०१४ मध्ये देशात झालेल्या चळवळीमुळे प्रकाश झोतात आला होता. अंब्रेला चळवळीमुळे प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिक टाईमच्या २०१४च्या सर्वात प्रभावशाली किशोरांमध्ये त्याचे नाव सामील झाले. त्यानंतर २०१५मध्ये फॉर्च्युन मासिकाने त्याला 'जगातील एक महान नेता' म्हणून संबोधले. तसेच वॉन्ग यांना वयाच्या २२ व्या वर्षी २०१८मध्ये नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले.

वॉन्गला त्याच्या दोन सहकारी कार्यकर्त्यांसह ऑगस्ट २०१७ मध्ये अटक करून तुरूंगात टाकण्यात आले होते. त्याच्यावर २०१४मध्ये सिव्हिक स्क्वेअरवर कब्जा मिळविण्यासाठी सहभाग असल्याचा आरोप ठेवण्यात आला. गेल्यावर्षी सुद्धा त्याला अटक करण्यात आली होती.