Mon, Jun 01, 2020 00:20होमपेज › International › नीरव मोदीचा जामीन चौथ्यांदा  फेटाळला 

नीरव मोदीचा जामीन चौथ्यांदा  फेटाळला 

Published On: Jun 12 2019 5:03PM | Last Updated: Jun 12 2019 5:03PM
लंडन : पुढारी ऑनलाईन

पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीचा लंडन मधील रॉयल कोर्ट्स ऑफ जस्टिजने जामीन अर्ज फेटाळला आहे. निरव मोदीचा जामीन फेटाळण्याची आजची चौथी वेळ आहे. या पूर्वी वेस्टमिन्स्टर कोर्टानेही सलग तीन वेळा मोदीची याचिका फेटाळली आहे. 

युकेच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी नीरव मोदीला लंडनमध्ये १९ मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  बुधवारी दुपारी नीरव मोदीच्या याचिकेवर सुनावणी झाली. जामिनासाठी नीरव मोदीच्या वतीने प्रकृतीचे कारण देण्यात आले होते. परुतु, नीरव मोदी याची जामिनावर सुटका केल्यानंतर तो शरण येईल हे मानण्यासाठी कोणताही ठोस आधार नसल्याचे कोर्टाने हा निर्णय देताना म्हटले आहे.

दरम्‍यान, मुंबईतील आर्थर रोड कारागृहात एक उच्च सुरक्षा असलेला बराक क्र. १२ तयार ठेवण्यात आली आहे. युकेमधून नीरव मोदीचे प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याची थेट या तुरुंगात रवानगी केली जाणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.