Thu, Sep 21, 2017 23:18
30°C
  Breaking News  

होमपेज › International › डान्स करा,५ हजार डॉलर मिळवा : गेलचे चॅलेंज

डान्स करा,५ हजार डॉलर मिळवा : गेलचे चॅलेंज

Published On: Jul 17 2017 4:50PM | Last Updated: Jul 17 2017 4:50PM

बुकमार्क करा


पुढारी ऑनलाइन 

वेस्ट इंडिजचा आघाडीचा फलंदाज ख्रिस गेल याने सनी लिओनच्या गाण्यावर डान्स करत सर्वांना एक ओपन चॅलेंज दिले आहे. गेलने नुकताच त्याच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओमध्ये तो  ‘लैला मै लैला’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.  

आतापर्यंत त्याने जाहिरातीतून बराच पैसा मिळवला आहे. त्यातूनच तो एक फुटबॉल टीम खरेदी करणार आहे. त्याचबरोबर भारतातील एका स्टार्टअपमध्येही पैशांची गुंतवणूकही करण्याचा त्याचा विचार आहे. 

गेलने हा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. ही पोस्ट टाकत त्याने असा डान्स करणाऱ्यास ५ हजार डॉलरचे बक्षीस देण्यात येईल असे जाहीर केले आहे. पुरुष आणि महिला असे कोणीही हे चॅलेंज स्वीकारू शकतात. यामध्ये इच्छुक आपले व्हिडीओ #ChrisGayleDanceChallenge  या हॅशटॅगने अपलोड करु शकतात. यांपैकी सर्वोत्तम ५ व्हिडीओ तो आपल्या पेजवर शेअर करील. या पाच व्हिडिओंमधून सर्वोत्तम असा कोणता हे मात्र प्रेक्षकच ठरवतील. विजेत्याचे नाव २४ जुलै रोजी ख्रिस गेल स्वतः जाहिर करेल.