Sun, Jan 26, 2020 16:39होमपेज › International › 'काश्मीर मुद्यावर मोदींनी मदत मागितली होती'

'काश्मीर मुद्यावर मोदींनी मदत मागितली होती'

Published On: Jul 22 2019 10:54PM | Last Updated: Jul 22 2019 10:54PM
वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका केलेल्या विधानावरून भारतीय राजकारणात वादंग माजण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान या उभय देशांना अत्यंत कळीचा आणि संवेदनशील मुद्दा असलेल्या काश्मीर प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर प्रश्नावरून मदत मागितली होती, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यामुळे काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यासाठी मला प्रेमच असेल असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पहिल्यांदाच ऐतिहासिक दौऱ्यावर आहेत. इम्रान खान यांनी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. इम्रान खान अमेरिकन दौऱ्यावर असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरवर वक्तव्य केल्याने भारतात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. भारत सातत्याने काश्मीर प्रश्नावर कोणत्याही देशाचा हस्तक्षेप नाकारत आला आहे.