Sat, Mar 23, 2019 00:15होमपेज › International › राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रथमच ब्रिटन भेटीवर 

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रथमच ब्रिटन भेटीवर 

Published On: Jul 12 2018 7:44PM | Last Updated: Jul 12 2018 7:46PMलंडन  : पुढारी ऑनलाईन

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच डोनाल्ड ट्रम्प ब्रिटनमध्ये द्विपक्षीय चर्चेसाठी दाखल झाले आहेत. ब्रेक्झिटनंतर ब्रिटनची प्रथमच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा होईल. ट्रम्प यांच्या वादग्रस्त विदेश धोरणांमुळे सातत्याने चर्चेत आहेत. ट्रम्प यांच्याविरोधात संपूर्ण ब्रिटनमध्ये निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत.

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा यांच्याशी ट्रम्प विविध मुद्यांवर द्विपक्षीय चर्चा करतील. ट्रम्प यांच्या विदेश धोरणांवर सातत्याने ब्रिटनने टीका केली आहे. मुस्लीमबहुल देशांना प्रवासबंदी, अमेरिका व मेक्सिकोच्या सीमेवर मुलांना पालंकापासून दूर करणे, युरोपीयन स्टील व ॲल्युमिनीअमच्या निर्यातीवर शुल्क लादणे आदी मुद्यांचा त्यामध्ये समावेश आहे. 

ब्रिटनला भेटीवर येणारे ट्रम्प १२ वे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. व्यापारी भागीदारीच्या पार्श्वभूमीवर उभय देशांमधील द्विपक्षीय भेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ब्रेक्झिटनंतर थेरेसा मे यांच्या मंत्रीमंडळातील दोन कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. या प्रकरणावर ट्रम्प यांनी पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर बोचरी टीका केली होती. ब्रेक्झिट धोरणामुळे थेरेसा मे यांना स्वपक्षीयांकडून आव्हानांचा सामना करावा लागला आहे.