Sun, Sep 22, 2019 21:46होमपेज › International › ज्युलियन असांजेचे अमेरिकेस प्रत्यार्पण करणार 

ज्युलियन असांजेचे अमेरिकेस प्रत्यार्पण करणार 

Published On: Jun 13 2019 3:51PM | Last Updated: Jun 13 2019 3:51PM
 लंडन : पुढारी ऑनलाईन

विकीलिक्स संस्थापक ज्युलियन अंसाजेचे अखेर अमेरिकेकडे प्रत्यार्पण केले जाणार आहे. ब्रिटनचे गृह सचिव साजिद जाविद यांनी असांजेच्या प्रत्यार्पणावर सह्या केल्या. गार्डियनने याबाबत वृत्त दिले आहे. अमेरिकेमध्ये अंसाजेवर हेरगिरी, हॅकिंगचे आरोप आहेत. 

असांजेच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेकडून ब्रिटनला विनंती करण्यात आली होती. अंसाजे सध्या अटकेत आहे. या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे, पण जाविद यांनी पूर्वीच सही करून असांजेच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीचा स्वीकार  केला आहे.  

इक्वेडोरच्या दुतावासातून लंडन पोलिसांकडून विकिलिक्स संस्थापक ज्युलियन अंसाजेला अटक करण्यात आली होती. इक्वेडोरच्या दुतावासात २०१२ पासून ज्युलियनने आश्रय घेतला होता. असांजेवर स्वीडनमध्ये लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ब्रिटनमधील न्यायालयाने त्याला २०१२ मध्ये जामीन दिला होता. 

असांजे सध्या ५० आठवड्यांची कैदेची शिक्षा ब्रिटनमधील बेलमार्श जेलमध्ये भोगत आहे. लैंगिक छळ आरोप प्रकरणात स्वीडनच्या ताब्यात जाऊ नये यासाठी असांजे शिक्षा भोगत आहे.