Tue, Jun 25, 2019 15:35होमपेज › International › अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात हिंदू महिलेने फुंकले रणशिंग!

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात हिंदू महिलेने फुंकले रणशिंग!

Published On: Jan 12 2019 9:32AM | Last Updated: Jan 12 2019 9:32AM
वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

आगामी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी इंडियन अमेरिकन तसेच अमेरिकन काँग्रेसमधील पहिल्या हिंदू लॉमेकर तुलसी गबार्ड यांनी रणशिंग फुंकले आहे. सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांच्यानंतर राष्ट्राध्यक्षपदासाठी शर्यतीत उतरणाऱ्या तुलसी केवळ दुसऱ्याच महिला आहेत. 

तुलसी यांनी सीएनएन वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या निर्णयाची माहिती दिली. दरम्यान, तब्बल  १२ डेमोक्रॅटीक नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देण्यासाठी सज्ज झाले आहेत. तुलसी डेमोक्रॅटीकडून हवाई प्रांतातून सलग चौथ्यांदा लॉमेकर म्हणून निवडून आल्या आहेत. आणखी एक इंडियन अमेरिकन कमला हॅरिस सुद्धा दावेदारी करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अमेरिकन हिंदू समूदायामध्ये तुलसी अत्यंत लोकपिय आहेत.

अवघ्या ३७ वर्षाच्या तुलसी यांनी आगामी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत बाजी मारल्यास  इतिहास होणार आहे. जगातील सर्वांत शक्तीशाली देशाच्या सर्वांत तरुण आणि पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान तुलसी यांच्या नावावर नोंदवला जाईल. 

अमेरिकन लोकसंख्येमध्ये एक टक्का हिंदू लोकसंख्येचा आहे. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा दावेदारी दिली आहे. त्यामुळे तुलसी आणि ट्रम्प यांच्यामध्ये थेट सामना होणार का हे पाहणे औत्सुक्याचे असेल. तुलसी यांनी हवामान बदल, आरोग्य, न्यायव्यवस्था सुधारणा आदी मुद्यांवर अधिक भर असणार असल्याचे नमूद केले आहे.