Tue, Oct 24, 2017 16:51होमपेज › International › दहशतवाद्यांनी केली अपहृत दाम्पत्याची सुटका

दहशतवाद्यांनी केली अपहृत दाम्पत्याची सुटका

Published On: Oct 13 2017 3:50PM | Last Updated: Oct 13 2017 3:50PM

बुकमार्क करा

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन वृत्त

तालिबानी दहशतवादी संघटनेने बंधक बनवलेल्या अमेरिकी-कॅनडाच्या दाम्पत्याची पाच वर्षांनी सुटका करण्यात आली आहे. तालिबानशी संबंधित हक्‍कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांनी २०१२ मध्ये या दाम्पत्याचे अपहरण केले होते. अमेरिकेच्या वाढत्या दबावापुढे पाकिस्तानने नमते घेतले आहे असेच या प्रकरणावरून दिसत आहे. 

अफगाणिस्तानमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या कॅटलान कोलमन आणि जोशूआ बॉयले या दाम्पत्याचे काबूलमधून अपहरण करण्यात आले होते. कॅटलान ही अमेरिकेची नागरिक असून तिचा पती जोशूआ हा कॅनडाचा नागरिक आहे. हे दाम्पत्य अफगाणिस्तानमध्ये कसे पोहोचले हे अजूनही अस्पष्ट आहे. त्यांच्या टूर प्रोग्रॅममध्ये अफगाणिस्तानचा समावेश नव्हता. 

हक्‍कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेने दाम्पत्याचे अपहरण करुन त्यांना ओलीस ठेवले होते. हक्‍कानी नेटवर्कला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने मदत केल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. अमेरिकेच्या दबावामुळेच पाकिस्तानने हक्‍कानी नेटवर्कच्या तावडीतून या दाम्पत्याची सुटका केल्याचा अंदाज आहे.