Thu, Aug 22, 2019 15:20होमपेज › International › श्रीलंकेतील सुसाइड बॉम्बरने युरोप, ऑस्ट्रेलियात घेतले होते उच्चशिक्षण 

श्रीलंकेतील सुसाइड बॉम्बरने युरोप, ऑस्ट्रेलियात घेतले होते उच्चशिक्षण 

Published On: Apr 24 2019 6:33PM | Last Updated: Apr 24 2019 6:33PM
कोलंबो : पुढारी ऑनलाईन 

ईस्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या साखळी आत्मघाती बॉम्बस्फोटाच्या तपासाने वेग घेतला आहे. त्यामुळे या दहशतवादी ह्ल्ल्यांबाबत नवीन माहिती उजेडात येत आहे. श्रीलंकेचे संरक्षण मंत्री रुवान विजेवर्धने यांनी नऊ सुसाइड बॉम्बरपैकी एक बॉम्बर महिला होती. याचबरोबर एक सुसाइड बॉम्बरने ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेतले होते, अशी माहिती त्यांनी दिली. 

रुवान विजेवर्धने यांनी ‘आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार एका सुसाइड बॉम्बरने ब्रिटनमध्ये शिक्षण घेतले होते नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी तो ऑस्ट्रेलियातही गेला होता. त्यानंतर तो श्रीलंकेत परतला.’ असे सांगितले. काल ( दि. २३ ) इस्लामिक स्टेटने (आयसिस) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. 

या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी भारतासह काही परदेशी गुप्तचर संघटनांनीही श्रीलंकेला मदत देऊ केली आहे. याबाबत बोलताना श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी ‘ हल्ला होण्यापूर्वी दोन तास आधी भारताच्या गुप्तचर संघटनेने याबाबत माहिती पुरवली होती. पण, याच्यावर कर्यवाही करण्यात आम्ही कमी पडलो. आतापर्यंतच्या तपासात या हल्ल्याचे कनेक्शन इतर देशांशीही जुळत असल्याने परदेशी गुप्तचर संघटनांना तपासात मदत करण्याचे आवाहन केले आहे. आमचे भारताबरोबर गुप्त माहितीचे चांगल्या प्रकारे आदान प्रदान सुरु आहे. याचबरोबर ब्रिटन आणि अमेरिकाही या प्रकरणी आम्हाला मदत करत आहे.’

पंतप्रधानांनी जरी या हल्ल्याचे प्लॅनिंग ख्राईस्टचर्च हल्ल्यापूर्वी झाले असले तरी हा हल्ला ख्राईस्टचर्च हल्ल्याचा बदला असल्याची शक्यता पूर्णपणे नाकारण्यात आलेली नाही. असेही सांगितले.