Mon, Mar 25, 2019 22:07होमपेज › International › जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन

जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन

Published On: Mar 14 2018 9:44AM | Last Updated: Mar 14 2018 10:32AMकेंब्रिज: पुढारी ऑनलाईन

जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या 76 वर्षी राहत्या घरी निधन झाले. स्टीफन हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1942 रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे झाला. त्याचे वडील डॉ.फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. तर आई इझाबेल या पदवीधर होत्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हॉकिंग दापंत्य उत्तर लंडनहून ऑक्सफर्डला आले. 

वाचा : Stephen Hawking Dies : अफाट इच्छाशक्तीचे दुसरे नाव स्टीफन हॉकिंग!

वाचा : जाणून घ्या स्टीफन यांच्याबद्दलच्या खास गोष्टी 

स्टीफन यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती. गणित विषयात विशेष आवड असलेल्या स्टीफन यांनी 17व्या वर्षी कॉसमॉलॉजी या विषयात स्कॉलरशिप सुद्धा मिळवली. 1962मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी घेतली आणि पुढील उच्च शिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. 1962च्या हिवाळी सुट्ट्यांमध्ये घरी असताना त्यांना त्रास होऊ लागला. डॉक्टरांना देखील रोगाचे अचूक निदान सापडत नव्हते. 8 जानेवारी 1963ला म्हणजेच वयाच्या 21व्या वर्षी स्टीफन यांना मोटर न्यूरॉन डिसीज हा असाध्य रोग झाल्याचे स्पष्ट झाले. या रोगामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपते. स्टीफन जास्ती जास्त दोन वर्ष जगतील असे डॉक्टरांनी सांगितले होते. पण त्यानंतर या अवलियाने व्हील चेअरवर बसून फक्त एक बोट वापरून सैद्धांतिक भौतिकशास्त्रात भरीव असे योगदान दिले. 

एक अवलिया हरपला

> 'अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम' या ग्रंथाने त्यांना जगबरात लोकप्रियता मिळवली 
> विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि पुंज गुरुत्व (क्वांटम ग्रॅव्हिटी) या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भात त्यांनी मोठे योगदान दिले. 
> ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट दिली
> १९७९ Royal Association for Disability and Rehabilitation या संस्थेकडून मॅन ऑफ दि इयरचा पुरस्कार
> स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनावर The Theory of Everything हा चित्रपट 2014मध्ये प्रदर्शित झाला होता.
> २००९ मध्ये 'प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर फ्रीडम' हा अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला