Tue, Jun 25, 2019 16:08होमपेज › International › पॅरिसमधील पहिले नग्न रेस्टॉरंट होणार बंद 

पॅरिसमधील पहिले नग्न रेस्टॉरंट होणार बंद 

Published On: Jan 12 2019 6:46PM | Last Updated: Jan 12 2019 6:46PM
पॅरिस : पुढारी ऑनलाईन 

जगभरात विविध चित्र विचित्र थिमवर हॉटेल निघत असतात. या बाबतचे व्हिडिओ आपण रोज इंटरनेटवर बघत असतो. असेच एक विचित्र रेस्टॉरंट २०१६ ला पॅरिमध्ये सुरु झाले होते. हे बहुदा जगातील पहिले नग्न रेस्टॉरंट आहे. आता या विचित्र रेस्टॉरंटला एकदातरी भेट द्यावी अशी बऱ्याच जणांना इच्छा झाली असणार पण, अशी इच्छा बाळगणाऱ्यासाठी एक वाईट बातमी आहे. हे नग्न रेस्टॉरंट बंद होणार आहे. 

पॅरिसमधील माईक आणि स्टिफन सादा या जुळ्यांना २०१६ मध्ये एक भन्नाट कल्पना सुचली. ही कल्पना होती पॅरिसमध्ये एक नग्न रेस्टॉरंट उघडण्याची. या मागे या दोघांचा ग्राहकाला उत्कृष्ट पदार्थांबरोबरच रोमान्स  आणि जवळीक साधण्याची संधी देण्याचा उद्येश होता. ही कल्पाना या दोन जुळ्यांनी आमलातही आणली. 

रेस्टॉरंटने ग्राहकांना आपले कपडे, मोबाईल आणि मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी लॉकरचीही सोय केली होती. जरी या रेस्टॉरंटमध्ये ग्राहक नग्न असले तरी येथील कर्मचारी मात्र पूर्ण कपड्यात असायचे. तसेच या रेस्टॉरंटमध्ये कॅमेरा आणण्यास सक्त मनाई होती. 

पण, आता हे रेस्टॉरंट बंद होणार आहे. या विचित्र रेस्टॉरंटला ग्राहकांच्या लाभणाऱ्या अल्प प्रतिसादामुळे हे बदं करण्याची वेळ रेस्टॉरंट मालकावर आली आहे. मालकाने १६ फेब्रुवारी २०१९ हा या विचत्र रेस्टॉरंटचा अखेरचा दिवस असणार आहे.