Fri, Mar 22, 2019 23:50होमपेज › International › मायदेशी परतल्यानंतर नवाज शरीफ यांचे काय होणार ?

मायदेशी परतल्यानंतर नवाज शरीफ यांचे काय होणार ?

Published On: Jul 12 2018 10:24PM | Last Updated: Jul 12 2018 10:24PMलंडन : पुढारी ऑनलाईन 

पाकिस्तानचे पदचुत्त पंतप्रधान नवाज शरीफ उद्या लंडनहून मायदेशी पतरतणार आहेत. मायदेशात परतल्यानंतर त्यांना लाहोर विमानतळावरूनच अटक केली जाणार की त्यांना रॅलीसाठी परवानगी दिली जाणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

पनामा पेपरमध्ये नाव आल्यानंतर नवाज शरीफ यांना भ्रष्टाचार प्रकरणात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडून गेल्या वर्षी जुलै महिन्यात दोषी ठरविण्यात आले होते. मागील आठवड्यात त्यांना त्याच गुन्ह्यात१० वर्षाची शिक्षा झाली आहे. त्यांनी लंडनमध्ये अवैध पद्धदतीने फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप होता. त्यांची मुलगी मर्यम नवाझ यांनाही याच प्रकरणात सात वर्षाची शिक्षा झाली आहे. 

दोघेही लंडनमध्ये असताना पाकिस्तानी न्यायालयाकडून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. लंडनमध्ये शरीफ यांच्या पत्नीवर उपचार सुरू आहेत. त्या अत्यंत गंभीर आजाराने त्रस्त आहेत. दरम्यान, माजी पंतप्रधान नवाज शरीफ व मर्यम यांनी शिक्षेला आव्हान अजून दिलेले नाही. उद्या लंडनहून लाहोर विमानतळावर आगमन झाल्यानंतर शरीफ यांना अटक केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

पाकिस्तानी मुस्लीम लीगच्या काही नेत्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांकडून अटकसत्र सुरू करण्यात आले आहे. नवाज शरीफ मर्यम यांच्यासह मायदेशात परतणार असल्याने पक्षाकडून जल्लोषात स्वागत करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये २५ जुलैला नॅशनल ॲसेम्बलीसाठी निवडणुका होत आहेत. शरीफ यांनी आपण शिक्षेसाठी घाबरत नसून पाकिस्तान मुस्लीम पक्षाला मतदान करा असे आवाहन केले आहे.