कराची विमान दुर्घटना; विमान कोसळण्यापूर्वी पायलटचे 'ते' अखेरचे शब्द...  

Last Updated: May 22 2020 11:00PM
Responsive image
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे (पीआयए) ए३२० हे विमान कराचीतील जिना विमानतळाजवळ कोसळून मोठी दुर्घटना घडली.


कराची (पाकिस्तान) : पुढारी ऑनलाईन

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे (पीआयए) पीके-८३०३ हे विमान आज, शुक्रवारी कराचीतील जिना विमानतळाजवळील दाट लोकवस्तीत कोसळून मोठी दुर्घटना घडली. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी या विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून सुमारे १०० जण होते. यातील ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना मोठी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या दुर्घटनेतून दोन पुरुष प्रवासी बचावले आहेत. 

हे विमान लाहोर वरून कराचीला येत होते. हे विमान विमानतळावरील धावपट्टीवर उतरण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर मॉडेल कॉलनी या रहिवाशी वस्तीवर कोसळले. गर्दी असलेल्या लोकवस्तीवर हे विमान कोसळल्याने हाहाकार उडाला. अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. तर अनेक वाहनांचा चक्काचूर झाला. येथील रस्ते अरुंद असल्याने घटनास्थळी बचावकार्यात अडथळे आले.

पाकिस्तानातील मीडियांनी दिलेल्या वृत्तानुसार, दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानाचे वैमानिक कॅप्टन सज्जाद गुल होते. विमान कोसळण्यापूर्वी वैमानिकाचा विमान वाहतूक नियंत्रकाशी संवाद झाला होता. विमानाच्या इंजिनमध्ये काहीतरी तांत्रिक समस्या असल्याची माहिती वैमानिकाने दुर्घटनेपूर्वी विमान वाहतूक नियंत्रकांना दिली होती. त्यानंतर दोन धावपट्ट्या विमान उतरवण्यासाठी उपलब्ध असल्याचे वैमानिकाला सांगण्यात आले होते. मात्र, विमान धावपट्टीवर उतरवण्यापूर्वी काही क्षणातच ते मॉडेल कॉलनीच्या लोकवस्तीत कोसळले. विमानाचे इंजिन निकामी झाले आहे, असे वैमानिकाचे शेवटचे शब्द होते.

तुम्ही एकटे नाही! अमेरिकेतील आंदोलनाला गुगलचा खंबीर पाठिंबा


नागपूरातील कोरोना कंट्रोलचा मुंडे पॅटर्न; अर्ली ट्रेसिंग, मास क्वारंटाईन, टीम मॅनेजमेंट


तब्बल ८ पावसाळी नक्षत्रांची सुरुवात रविवारीच! 


संगीतकार वाजिद यांच्याबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?


सातारजवळ एकाचा डोक्यात दगड घालून खून


पाससाठी तब्बल २३ वेळा अर्ज करणारा बहाद्दर सापडला जाळ्यात!


पुण्यात बाधितांची वाटचाल आठ हजारांकडे 


भारतात एकाच दिवसात पुन्हा एकदा ८ हजार प्लस बाधित; दोन लाखांकडे वेगाने वाटचाल


मोहम्मद शमीच्या बायकोने 'न्यूड' फोटो शेअर केल्याने सगळेच हैराण!


मान्सून पूर्व पावसाने वाळव्यातील शेतकरी सुखावला