Fri, Mar 22, 2019 00:03
    ब्रेकिंग    होमपेज › International › इम्रान खान यांचा शपथविधी लांबणीवर?

इम्रान खान यांचा शपथविधी लांबणीवर?

Published On: Aug 10 2018 7:59PM | Last Updated: Aug 10 2018 7:59PMइस्लामाबाद (पाकिस्तान) : पुढारी ऑनलाईन

पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमूख इम्रान खान हे १८ ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. पीटीआय पक्षाचे फैसल जावेद यांनी तसे स्पष्ट केले असल्याचे वृत्त आहे.

पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन १४ ऑगस्ट रोजी आहे. त्यापूर्वी इम्रान खान पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचा अंदाज याआधी व्यक्त करण्यात आला होता. मात्र, ते १८ ऑगस्ट रोजी शपथबद्ध होणार असल्याचे जावेद यांनी म्हटले असल्याचे वृत्त पाकिस्तानमधील मीडियांनी दिले आहे.

खान यांच्या शपथविधी सोहळ्याबाबत वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत. पीटीआय पक्षाने ११६ जागा जिंकल्या आहेत. त्यांच्याकडे सरकार स्थापनेसाठी संख्याबळ कमी आहे. पीटीआय पक्षाने छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीच्या आधारावर सरकार स्थापनेसाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे.