Tue, May 26, 2020 14:47होमपेज › International › न्यूयॉर्कच्या प्रत्येक गल्लीत कोरोनाबाधित!

न्यूयॉर्कच्या प्रत्येक गल्लीत कोरोनाबाधित!

Last Updated: Apr 04 2020 7:06PM
वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

महासत्ता अमेरिकेतील न्यूयॉर्क ही महानगरी कोरोना व्हायरसच्या भयावह फैलावाला बळी पडली आहे. न्यूयॉर्कच्या प्रत्येक गल्लीत किमान एक व्यक्ती असा आहे ज्याने कोरोनामुळे आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले आहे किंवा तो स्वतः कोरोनाबाधित आहे. 

अमेरिकेत आतापर्यंत दोन लाखांपेक्षाही अधिक कोरोनाबाधित समोर आले आहेत. तिथे ६ हजार ९५ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्कलाच बसला आहे. 

शहरात आतापर्यंत १ हजार ५०० पेक्षाही अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ५२ हजारपेक्षाही अधिक लोक संक्रमित झाले आहेत. अर्थात, हा केवळ सरकारी आकडा आहे. वास्तवात यापेक्षाही वाईट अवस्था आहे.