Tue, Jun 25, 2019 15:10होमपेज › International › पॅरिसमध्ये स्फोट; २ फायर फायटर्सचा मृत्यू, ४७ जखमी

पॅरिसमध्ये स्फोट; २ फायर फायटर्सचा मृत्यू

Published On: Jan 12 2019 2:44PM | Last Updated: Jan 12 2019 7:58PM
पॅरिस (फ्रान्स) : पुढारी ऑनलाईन

फ्रान्सची राजधानी पॅरिस शहर शनिवारी शक्तिशाली स्फोटाने हादरले. हा स्फोट पॅरिस शहराच्या मध्यवर्ती भागात एका बेकरीत घडला आहे. यात ४७ जण जखमी झाले असून १० जणांची प्रकृत्ती गंभीर आहे. तर या घटनेत २ फायर फायटर्सचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पॅरिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गॅस गळतीमुळे हा स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की यामुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. स्फोटामुळे अनेक कारगाड्यांचा चक्काचूर झाला आहे. स्फोटानंतर मोठी आग लागली. सुमारे २०० फायर फायटर्सच्या मदतीने ही आग नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेनंतर आजूबाजूच्या भागातील इमारती रिकाम्या करण्यात आल्या.

ही घटना शनिवारी सकाळी सेंट सिसिले आणि रुआ दी ट्रिवाईज रस्त्यावरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या बेकरीत घडली आहे. हा भाग नेहमी लोकांनी गजबजलेला असतो.