भारतीय वंशाच्या उद्योजकाची अमेरिकेत अपहरण करून हत्या

Published On: Oct 08 2019 1:34AM | Last Updated: Oct 07 2019 8:53PM
Responsive image


कॅलिफोर्निया :

भारतीय वंशाचे आयटी उद्योजक तुषार अत्रे (वय 50) यांची अमेरिकेत अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. अत्रे यांचा मृतदेह त्यांच्या गाडीत आढळून आला. सिलीकॉन व्हॅलीमधील अत्रेनेट इंक या कंपनीचे ते मालक होते. ते कोट्यधीश होते. 1 ऑक्टोबरला काही अज्ञात व्यक्तींनी कॅलिफोर्नियातील त्यांच्या घरात घुसून अत्रे यांना पांढर्‍या रंगाच्या बीएमडब्ल्यू गाडीतून पळवून नेले होते. पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला असून दरोड्याच्या हेतूने अपहरण केल्याचा संशय आहे.