भारताला मिळालं पहिलं राफेल विमान; राजनाथ यांच्याकडून पूजन

Last Updated: Oct 09 2019 8:35AM
Responsive image

Responsive image

पॅरिस : ऑनलाईन पुढारी 
दसऱ्याच्या मुहुर्तावर भारताला फ्रान्स कडून पहिलं राफेल लढावू विमान आज दि. ८ रोजी मिळलं. विशेष म्हणजे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विमान भारताच्या ताब्यात मिळताच त्याच शस्त्र पूजन केलं. दसॉल्ट कंपनीने बनवलेल्या पहिल्या लढावू विमानाचा भारताच्या ताफ्यात  समावेश झाला आहे. अशी आणखी ३५ विमानं भारताला मिळणार आहेत. 

दसऱ्याचे आणि हवाईदलाच्या ८७ व्या स्थापनादिनाचे औचित्यानिमित्ताने राफेल भारताकडे सुपूर्द करण्यात आले. भारतीय परंपरेनुसार दसऱ्यानिमित्त या राफेलचं पूजन राजनाथ सिंह यांनी केलं. त्यांनी विधीवत विमानची पूजा केली. विमानावर एक ओम काढण्यात आल. या विमानस राजनाथ यांनी नारळ ही चढवला तसेच विमानांच्या चाकाखाली लिंबूही ठेवण्यात आले होते. थोड्याच वेळात राजनाथ सिंह हे या राफेल विमानाची सफर घेणार आहेत.

२०१६ साली राफेलच्या ३६ विमानांचा करार फ्रान्सने भारतासोबत केला होता. त्यामधील पहिलं विमान आज भारताला मिळालं. या राफेलवरुन लोकसभा निवडणुकीच्या वेळी यामध्ये मोठा घोटाळा केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.   

या राफेल लढावू विमानात मिटिऑर आणि स्काल्प ही क्षेपनास्त्र तैनात करण्यात आली आहेत. हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता या विमानात आहे. त्यामुळे भारताच्या हवाईदलाची ताकत आणखी वाढणार आहे.