पाकिस्तानला शेवटचा इशारा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार

Last Updated: Oct 18 2019 6:43PM
Responsive image

Responsive image

पॅरिस : पुढारी ऑनलाईन 

मागील काही दिवसांपासून पाकिस्तान या ना त्या कारणाने चर्चेत आहे. जगाच्या पटलावर टेरर फंडिंग करण्यावरून थेट पाकिस्तानचे नाव घेतले जाते. या कारणावरूनच पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट करण्यात येणार होते. मात्र, यातून पाकिस्तान सध्या बचावला आहे. टेरर फंडिंगच्या कारणावरून पाकिस्तानला वाढ मिळाली असून ही मुदत फेब्रवारी २०२० पर्यंत एफएटीएफने दिली आहे.

टेरर फंडिंगच्या वरून शुक्रवारी फायनांन्शियल अॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, फेब्रुवारी २०२० पर्यंत त्यांनी दहशतवादावर अॅक्शन प्लॅन तयार करून त्याच प्रमाणे काम करावे. जर ठरलेल्या कालावधीत पाकिस्तान यात अपयशी झाला, तर होणाऱ्या कारवाईसाठी त्याने तयार रहावे. तर पाकिस्तानच्या आर्थिक घडामोडी आणि व्यवसायांवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश सदस्यांना देण्यात आले आहेत. चीन, मलेशिया आणि तुर्कीच्या समर्थनामुळे सध्या पाकिस्तान ब्लॅकलिस्ट होण्यापासून वाचला होता. मात्र त्याला एफएटीएफच्या ग्रे लिस्ट मधून बाहेर पडणे कठिण आहे. 

फेब्रुवारी २०२० पर्यंत पाकिस्तान ब्लॅकलिस्ट 

सुत्रांच्या म्हणण्यानुसार, जरी सध्या एफएटीएफने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले असले तरी, जो पर्यंत दहशतवादाच्या विरोधात योग्य पावले पाकिस्तानकडून उचलली जात नाहीत तोपर्यंत किंवा येणाऱ्या कालावधीत या यादीतून बाहेर पडणे त्याला कठिण आहे. तर याचवेळी आंतरराष्ट्रीय संस्थेने पाकिस्तानला २०२० पर्यंत ब्लॅकलिस्ट करण्याची शक्यता वर्तविली आहे. असे करून एफएटीएफने पाकिस्तानला एक खास आणि महत्वपुर्ण संदेश दिला आहे. त्याच बरोबर एफएटीएफने आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थांना फेब्रुवारी २०२० पासून पाकिस्तानला कोणतीही मदत न करण्यासाठी तयार राहण्याचे संकेत दिले आहेत.

ब्लॅकलिस्ट झाल्यास पाकिस्तानचे मोडेल कंबरडे

जर पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट केले गेले तर त्याला कर्ज काढणे अवघड जाईल. या यादीत नाव आल्यानंतर पाकिस्तानात होणारी परकीय गुंतवणूक बंद होणार आहे. ब्लॅकलिस्ट झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय जागतिक संस्था पाकिस्तानचे नामांकन कमी करू शकतात. पाकिस्तानसाठी जागतिक बँक आणि आयएमएफ (IMF) पैसा घेणे कठिण होणार. तर चिन, सौदी यासारख्या देशांकडून या आपली दयनिय अवस्था सुधारण्यासाठी निधी मिळविणेही कठीण असू शकते.

ग्रे आणि ब्लॅकलिस्ट च्या मध्ये डार्क ग्रे

एफएटीएफ च्या नियमांनुसार ग्रे आणि ब्लॅकलिस्ट च्या मध्ये डार्क ग्रे अशी एक आनखी लिस्ट आहे. डार्क ग्रे याचा अर्थ निर्वानिचा इशारा, कारण यानंतर शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी सुधरण्याचा प्रयत्न करावा.