होमपेज › International › अमेरिकेने तुर्कस्तानच्या स्टीलवर लादले दुप्पट शुल्क

अमेरिकेने तुर्कस्तानच्या स्टीलवर लादले दुप्पट शुल्क

Published On: Aug 10 2018 8:57PM | Last Updated: Aug 10 2018 8:57PMवॉशिंग्टन (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन

अमेरिका आणि तुर्कस्तान दरम्यानचे द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत. चीननंतर आता तुर्कस्तान विरोधात अमेरिकेने ट्रेड वॉर सुरू केले आहे.

तुर्कस्तानमधून आयात होणाऱ्या स्टील आणि ॲल्युमिनियमवर दुपटीने शुल्क वाढविण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

तुर्कस्तान हा स्टीलचा मोठा निर्यातदार देश आहे. आता तुर्कस्तानच्या स्टीलवर ५० टक्के आणि ॲल्युमिनियमवर २० टक्के शुल्क लागू केले जाणार आहे, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. 
''सध्या तुर्कस्तानबरोबर आमचे संबंध चांगले नाहीत," असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.