Fri, Nov 24, 2017 19:59होमपेज › International › पाकिस्तानी वकिलाचा दावा...भगतसिंग निर्दोष

पाकिस्तानी वकिलाचा दावा...भगतसिंग निर्दोष

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

लाहोर: पुढारी ऑनलाईन 

देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वयाच्या २३व्या वर्षी फासावर गेलेले क्रांतिकारक शहीद भगतसिंह यांच्याविरुद्धचा खटला पुन्हा एकदा न्यायालयासमोर आला आहे.एका ब्रिटीश अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी भगतसिंह यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती.याप्रकरणी भगतसिंह निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानमधील लाहोर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

तब्बल ८६ वर्षानंतर पाकिस्तानमधील एका वकिलाने भगतसिंह निर्दोष असल्याचे सांगत याचिका दाखल केली आहे. लाहोर येथील वकील इतियाझ रशीद कुरेशी  यांनी सोमवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.  

गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये लाहोर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पाकिस्तानच्या सरन्यायाधिशांना कुरेशी यांच्या याचिकेची सुनावणी मोठ्या खंडपीठाची स्थापना करण्याची सूचना केली होती. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. 

कुरेशी लाहोरमध्ये भगतसिंह मेमोरियल फाऊंडेशन चालवतात. भगतसिंह यांनी संपूर्ण भारताच्या स्वतंत्र्यासाठी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा दिला होता,असे कुरेशी यांनी याचिकेच म्हटले आहे.

भगतसिंह यांना पुरस्कार देण्याची मागणी 

कुरेशी यांनी याचिकेत भगतसिंह यांना पुरस्कार देऊन गौरव करावा असे याचिकेत म्हटले आहे. इंग्रजांनी २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंह यांना फाशीची शिक्षा दिली होती. यात भगतसिंह यांच्यासह सुखदेव आणि राजगुरु यांचा देखील समावेश होता. भगतसिंह यांना निर्दोष करण्यासाठीच्या याचिकेवर या महिन्यात सुनावणी होण्याची आशा आहे, असे कुरेशी यांनी सांगितले. इंग्रजांनी भगतसिंह यांना एका खटल्यात प्रथम जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर दुसऱ्या एका बनावट खटल्यात त्यांचे नाव टाकण्यात आले आणि फाशीची शिक्षा दिली.

ब्रिटिश अधिकारी जॉन सँडर्स याची १७ डिसेंबर १९२८ रोजी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी लाहोरमधील पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरची प्रत २०१४मध्ये न्यायालयात दाखल करण्यात आली होती. उर्दूमध्ये लिहण्यात आलेल्या या एफआयआरमध्ये दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. १७ डिसेंबर १९२८ रोजी दुपारी ४.३० मिनिटांनी हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. 

भारतीय दंड संहिता ३०२, १२०१ आणि १०९ कलमानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. यात भगतसिंह यांचा उल्लेख नसल्याचे कुरेशी यांनी म्हटले आहे. एफआयआरमध्ये नाव नसताना देखील नंतर भगतसिंह यांना फाशी देण्यात आल्याचे कुरेशी यांनी याचिकेत म्हटले आहे.