होमपेज › International › युद्धाची खुमखुमी करणाऱ्या चीनला अमेरिकेकडून आणखी एक तगडा झटका!

युद्धाची खुमखुमी करणाऱ्या चीनला अमेरिकेकडून आणखी एक तगडा झटका!

Last Updated: May 28 2020 9:49AM

संग्रहित छायाचित्रवॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

चीनला तगडा झटका देताना अमेरिकन संसदेत अवैधपणे चीनच्या ताब्यात असलेले तिबेट हे स्वतंत्र एक राष्ट्र असल्याचे विधेयक सादर करण्यात आले आहे. सिनेटर स्कॉट पेरी यांनी याआधीही चीनच्या ताब्यातील हाँगकाँग हेही एक स्वतंत्र राष्ट्र असल्याचे विधेयक अमेरिकन संसदेत मंजुरीसाठी सादर केले आहे.

अधिक वाचा : भारतीय लष्करप्रमुखांचे वक्‍तव्य नेपाळसाठी अपमानजनक : पोखरेल

हाँगकाँगच्या स्वातंत्र्याबाबतच्या आधीच पारित झालेले विधेयक व्हाईट हाऊसमध्ये स्वाक्षरीसाठी प्रलंबित आहे. असे झाल्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या दोन्ही प्रदेशांना आंतरराष्ट्रीय संकेतानुसार स्वतंत्र देश म्हणून वागणूक देऊ शकतील. उदाहरणार्थ, विधेयक पारित झाल्यानंतर तिबेटचे प्रातिनिधिक स्वरूपातील प्रमुख म्हणून बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचे अमेरिकेतील स्वागत ते (ट्रम्प) एखाद्या अन्य राष्ट्रप्रमुखाच्या थाटात करू शकतील.

अधिक वाचा : खोल सोन्याच्या खाणीतही धडकला कोरोना

चीनने लष्करी बळाच्या जोरावर तिबेटवर कब्जा मिळविलेला आहे. तिबेटीयन स्वातंत्र्यलढ्याचे प्रमुख तसेच तिबेटियन बौद्ध धर्मगुरू दलाई लामा हे भारतात धर्मशाळा (हिमाचल प्रदेश) येथे आश्रयाला आहेत. अमेरिकेतील या प्रस्तावानंतर चीन आणि अमेरिकेदरम्यान वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. हाँगकाँग आणि तिबेट हे चीनचेच भूभाग आहेत, यावर चीन ठाम आहे. तथापि, अमेरिका या दोन्ही भूभागांना तसेच तेथील लोकांना इथून पुढे स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणार आहे.

अधिक वाचा : हाँगकाँगप्रश्नी अमेरिकेने चीनची केली कोेंडी

हाँगकाँगवर मालकी घट्ट करण्यासाठीच चीनने एक नवा कायदा पास केला आहे. या कायद्याला ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा’ असे गोंडस नाव दिले आहे. कायद्यान्वये स्वातंत्र्याच्या मागणीसाठी निदर्शने करणे राष्ट्रद्रोह मानले जाणार आहे. हाँगकाँगमध्ये या कायद्याला प्रखर विरोध होत असताना, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निदर्शकांच्या बाजूने झुकणारी विधाने केली आहेत.

हाँगकाँगमध्ये चीन जे जे काही करते आहे, ते योग्य नाही. आम्ही त्याबद्दल लवकरच भूमिका घेणार आहोत, असे निवेदन डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांसमोर बोलताना केले होते आणि हे विधेयक सादर झाले आहे. ट्रम्प यांनी कोरोना हा चीनचा कट असल्याचे म्हटलेले असून, त्यामागे मी (ट्रम्प) अमेरिकेतील निवडणुकांमध्ये पराभूत व्हावे, हा चीनचा हेतू असल्याचा खळबळजनक आरोपही केला आहे.

स्कॉट पेरी यांचे मानावे तेवढे आभार थोडे आहेत. तिबेट हे स्वतंत्र राष्ट्र आहेच. एकाही तिबेटीयन बौद्धाला कम्युनिस्ट चीनचे तिबेटवरील अधिपत्य मान्य नाही.
तेन्झीन त्सुन्द्यू, एक तिबेटीयन स्वातंत्र्ययोद्धा (सध्या भारतात शरणार्थी म्हणून वास्तव्य)