Fri, Jul 10, 2020 20:14होमपेज › International › 'पाकिस्तानच्या माजी गृहमंत्र्यांनी माझ्यावर राष्ट्रपती भवनात बलात्कार केला'

'पाकिस्तानच्या माजी गृहमंत्र्यांनी माझ्यावर राष्ट्रपती भवनात बलात्कार केला'

Last Updated: Jun 06 2020 9:20AM

संग्रहित छायाचित्रइस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन

अमेरिकन महिला सिंथिया डॅन रिची यांनी पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रेहमान मलिक यांनी इस्लामाबादमधील राष्ट्राध्यक्ष भवन येथे बलात्कार केल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसुफ रझा गिलानी आणि त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांनी मानसिक छळ केल्याचा आरोपही रिची यांनी केला. रिचीच्या या दाव्याने पाकिस्तानच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. 

अधिक वाचा : अमेरिकी पोलिसांच्या वर्दीवर पुन्हा रक्ताचे शिंतोडे

फेसबुक लार्इव्ह दरम्यान रिची म्हणाल्या की, २०११ मध्ये रहमान यांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) सत्तेत होती. पीपीपीच्या इतर नेत्यांनीही त्यांचे शोषण केले. आता रिची यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. रिची म्हणाल्या की, त्यांच्याकडे याबाबत बरेच पुरावे आहेत आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ती नक्कीच सादर करेल.

अधिक वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून झटके सुरुच असल्याने आता चीनकडूनही पलटवार!

सिंथिया म्हणाल्या की, 'मी २०११ मध्ये अमेरिकन दूतावासातील एका व्यक्तीला याबद्दल माहिती दिली होती. त्यावेळी कठीण परिस्थिती आणि अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधामुळे फारसा फायदा झाला नाही. मी सध्या पाकिस्तानमधील एका शानदार व्यक्तीशी नात्यामध्ये आहे. त्यानेच मला बोलण्यासाठी प्रोत्साहित केले. यानंतरच आम्ही जोडीदार म्हणून पाऊल टाकू शकतो.

अधिक वाचा : 'पंधरा दिवसांच्या आत सर्व स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवा'

रिची यांनी फेसबुकवर सांगितले की, 'मी बरीच वर्षे शांत राहिली. याचे कारण म्हणजे पीपीपी नेते मला धमकावत राहिले. यामुळे मला काही बोलता आले नाही. आता संपूर्ण जगाला या घटनेविषयी जाणून घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मी हे सत्य सर्वांसमोर ठेवले.