Fri, Sep 21, 2018 01:48होमपेज › Goa › सांगे येथे ‘साळावली’त मडगावचा तरुण बुडाला

सांगे येथे ‘साळावली’त मडगावचा तरुण बुडाला

Published On: Apr 23 2018 1:15AM | Last Updated: Apr 23 2018 12:19AMकाकोडा ः वार्ताहर

दापोडा-भाटी सांगे येथे साळावली धरणाच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरलेल्या तिघा मित्रांपैकी सिद्धेश मुल्ली (वय 35, रा.रावणफोंड-मडगाव) या तरुणाचा बुडून मृत्यू होण्याची घटना रविवारी दुपारी घडली. 
सांगे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रावणफोंड-मडगाव येथील सिद्धेश मुल्ली व त्याचे दोघे मित्र मद्यप्राशन करून दुपारी पाण्यात आंघोळीसाठी उतरले होते. धरणातील पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने सिद्धेश बुडाला. 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक  तरुणांच्या मदतीने सिद्धेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात सांगे पोलिसांना यश आले. पोलिस उपनिरीक्षक सुधीर रेडकर यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिसियो इस्पितळाकडे पाठवून दिला. सांगे पोलिस पुढील तपास करत आहेत.